राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिन अहिल्या भवन सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरा..

राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिन अहिल्या भवन सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरा..

राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिन अहिल्या भवन सभागृहामध्ये केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . 

यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच कॅमेऱ्याचे पूजन करून करण्यात आली. राहुरी पोलीस स्टेशन चे पी. आय. धनंजय जाधव आणि कॅप्टन आदिनाथ तनपुरे भारतीय नौसेना, फोटोग्राफी मार्गदर्शक पंडित मुदगुल , युवा उद्योजक मोरया उद्योग समूह गोरख अडसुरे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले . प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवरांचा शाल, पुष्प गुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले तसेच शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे आणि खेळाडू फोटोग्राफर बांधवांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व फोटोग्राफर बांधवांना संस्थेचे टी शर्ट , आय कार्डचे वाटप करण्यात आले . 

      पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आपला फोटोग्राफीचा अनुभव सर्व फोटोग्राफर बांधवाना सांगितला तसेच संपूर्ण देशामध्ये ११२ हा आपत्कालीन सहाय्यता क्रमांक सुरु केला असल्याची माहिती दिली 

  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पो.नि.

धनंजय जाधव, कॅप्टन आदिनाथ तनपुरे भारतीय नौसेना ,मुदगुल पंडित,गोरखशेठ अडसुरे हे होते . या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ फोटोग्राफर ज्ञानेश्वर माने हे होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष धनंजय गुलदागड , उपाध्यक्ष बाबा जाधव , राजेंद्र आढाव,वैभव धुमाळ नजीर सय्यद हे होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव गणेश नेहे ,तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजा भोरे,कुलदीप नवले,किरण सातपुते,सुनील बेंद्रे, नवनाथ बेंद्रे, अक्षय नारद , दीपक गुलदगड यांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ फोटोग्राफर किरण शिंदे, गंगाधर गीते, जाकीर शेख, बाबासाहेब सूर्यवंशी, सुभाष दहाड, संजय आकडे, ईश्वर लहारे, अनिल जाधव, दत्ता तारडे, मच्छिंद्र विटनोर, चंद्रकांत म्हसे,भाऊसाहेबl विटनोर, संजय आढाव, बापू कडू, सुनील वैद्य,बाबासाहेब कळमकर, ज्ञानेश्वर शिरसाट, बाळासाहेब बनसोडे, बनसोडे ,बापू चितळकर, बद्रीश देहाड राय, विजय परदेशी, सोमनाथ शिरसाठ तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील फोटोग्राफर बांधव, पत्रकार उपस्थित होते तसेच संस्थेच्या वतीने सर्व फोटोग्राफर बांधवांसाठी हॉटेल सर्जा येथे स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी मोठ्या आनंदमय वातावरणात जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी विजुभाऊ तमनर यांनी अहिल्या भवन संस्थेसाठी उपलब्ध करून दिले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने फोटोग्राफर बंधू उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार माजी सचिव दत्ता तारडे यांनी मानले वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.