अहमदनगर जिल्ह्यातील ता.राहुरी च्या मौजे डिग्रस येथील उत्कृष्ठ प्रशासकीय कामकाज करणारे तल्हाटी आमोलजी कदम यांची बदली जेष्ठ नागरिक व पत्रकारांनी केला सन्मान.

अहमदनगर जिल्ह्यातील ता.राहुरी च्या मौजे डिग्रस येथील उत्कृष्ठ प्रशासकीय कामकाज करणारे तल्हाटी आमोलजी कदम यांची बदली जेष्ठ नागरिक व पत्रकारांनी केला सन्मान.

अहमदनगर जिल्ह्यात नाव लौकीक असलेली ग्रामपंचायत ता.राहुरी च्या मौजे डिग्रस,वरवंडी,सडे,खडांबे,या गावांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे महसूलचे /शेतकऱ्यांचे कामकाज करणारे तसेच त्यांनी भारतीय सैन्यदलात १६ वर्ष देशसेवा केल्याचा प्रदीर्घ अनुभव घेऊन सैन्यदलातील सेवा पूर्तीनंतर त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची महसुल / तल्हाटी या पदावर काम करून सर्वसामान्य जनतेस योग्य न्याय मिळवून देण्याचे ठरविले व मौजे डिग्रस येथे ही आमोलजी कदम यांनी ५ वर्ष उत्कृष्ठ नोकरी केली.

तसेच कोरोना काळामध्ये ही त्यांनी सर्वसामान्य जनतेची चांगल्या प्रकारे सेवा केली त्यांच्या प्रशासकीय बदली मुळे सर्व सामान्य जनतेमध्ये नाराजी व्यक्त होतांना दिसत आहे

डिग्रस येथे विद्यमान उपसरपंच रावसाहेबजी पवार यांच्या निवासस्थानी त्यांचा शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

यावेळी उपस्थित उपसरपंच रावसाहेबजी पवार,सुभाषजी बेल्हेकर, राजु पा.भिंगारदे,ह.भ.प.राजुदादा थेटे, तानाजी पवार,हेमंत मकासरे,साईनाथ बेल्हेकर,पत्रकार राजु पवार,आनिसभई सय्यद,लहारे बाबा, बापूसाहेब ग्रा.पं.डिग्रसचे लिपिक गिरगुणे,बाबासाहेब पवार,दत्ता पटेकर,

उत्कृष्ठ शेतकरी आण्णासाहेब पवार, माजी सरपंच जगन्नाथ गिरगुणे, गोरख जाधव,या सर्वांनी श्री कदम यांचा सत्कार केला

तसेच ग्रामपंचायत डिग्रस येथे गावचे प्रथम नागरीक सरपंच सौ रेणूका कुंडलिक गावडे पती पत्नी, प्रभारी ग्रामसेवक श्री सुरेश डोंगरे,सेवानिवृत्त कोतवाल बापूसाहेब जाधव,विद्यमान ग्रा.प.सदस्य आनिल शिंदे,योगेश पवार,ग्रा.प.रो.सेवक अजय गावडे, वसूली कर्मचारी शरद पवार,कर्मचारी जाधव दादा, पाणी व्यवस्थापन कर्मचारी शिवा पवार,लाईट व्यवस्थापन कर्मचारी शाम मेटे, स्वच्छता कर्मचारी संगीता कार्ले, सविता जगधने,तसेच Delhi 91 BPS Live NEWS NETWORK

चे अहमदनगर जिल्हा प्रमुख श्री सचिनजी पवार या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी श्री आमोलजी कदम सरांनी डिग्रस व इतर गावांतील नागरीकांनी त्यांना प्रशासकीय कामात चांगले सहकार्य केले आपल्या सहकार्यामुळे येथील सर्व कामकाज चांगल्या पद्धतीने हाताळता आले त्यामुळे श्री कदम सर यांनी सर्वांचे आभार मानले व पुढील त्यांच्या बदलीचे ठिकाण श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे कार्यभार संभाळण्यास त्यांनी डिग्रस ग्रामस्थ, तसेच सर्व क्षेत्रातील मित्रांचा निरोप घेतला.