चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा.
*चाईल्ड करिअर मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा*
चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीअम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज,सलाबतपुर या विद्यालयात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'१५ ऑगस्ट २०२२ रोजी मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणारे प्रमुख पाहुणे नायब सुभेदार श्री.पाठक व नायक श्री.गोरक्षनाथ काळे मेजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अंबादास गोरे काका प्रमुख पाहुणे श्री.तुकाराम पिसे साहेब होते.
स्वातंत्र्यदिना निमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुलांचे भाषण, देशभक्तीपर गीते,डांन्स हे आकर्षणाचे केंद्र बिंदू होते. *एक मुल एक झाड* उपक्रमांतर्गत आयुर्वेदीक वृक्ष लागवड व कुंडी सजावट स्पर्धा घेऊन पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री.पाठक मेजर यांनी मुलांना इंग्रजी भाषा किती आवश्यक आहे आणि त्यामुळे आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो, तसेच मिलीटरी,एअर फोर्स ,नेव्ही मध्ये इंग्रजीला किती महत्व आहे हे पटवून दिले. मेजर गोरखनाथ काळे यांनी योग्य मार्गदर्शन करून ,भविष्यात आपल्या शाळेतील आर्मी मध्ये भर्ती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांना सर्वोपरि मदत करण्याचे आश्वासन दिले.. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सागर बनसोडे सर यांनी विद्यार्थांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संजय गरूटे यांनी केले.अध्यक्ष निवड सौ.छाया निकम यांनी केली.तर अनुमोदन शारूख सय्यद यांनी दिले. प्रास्ताविक प्राचार्य संदिप खाटीक सर यांनी केले.आभारप्रदर्शन अमोल इंगळे यांनी केले.
या वेळी गणेश गवळी,आकाश वाकचौरे,प्रमोद मते,मोहन भगत,जुनेद शेख,जियावूल शेख,आदिनाथ निकम,श्रीमती भडके,भास्कर गोरे,आप्पासाहेब गोरे,संतोष कडु,हरीश मते,गणेश साळुंके,रावसाहेब औताडे, कैलास तांबे आदी पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.विजय खाटीक, प्रा.अमोल इंगळे,प्रा.संजय गरूटे,
अभिजीत आरगडे,
सौ.छाया निकम,स्वाती गायकवाड,उमा कुमावत,आरती जैन,लिंबे,जाधव,अशोक मगर यांचे मोलाचे सहकार्य
लाभले.