कर्मयोगी भूमिपुत्र कै. मोहनलाल चोपडा साहेब (पोपट शेठ)यांना त्यांच्या जन्मगावी विविध ठिकाणी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.

कर्मयोगी भूमिपुत्र कै. मोहनलाल चोपडा साहेब (पोपट शेठ)यांना त्यांच्या जन्मगावी विविध ठिकाणी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कर्मयोगी भूमिपुत्र ,उद्योजक मोहनलालजी गिरीधरलालजी चोपडा यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.

       बालाजी देडगाव या जन्मभूमीवर त्यांनी अतोनात प्रेम केले. जरी कर्मभूमी त्यांची पूना शहर असले तरी ते आपल्या मातृभूमीला विसरले नाही.अतिशय शून्यातून सुरुवात करत मोठी यशाची पायरी चढत एक उद्योगपती, उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. 

      त्यांनी आपल्या गावसाठी भरपूर योगदान दिले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेसाठी संरक्षण भिंत, संगणक लॅब ,सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ व स्मार्ट बोर्ड दिले . तसेच अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी ११वी व १२वी या विद्यार्थ्यांची गैरसोय होती म्हणून या उच्च वर्गासाठी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ४ खोल्या बांधून दिल्या व शाळेसाठी संरक्षण भिंत दिली. व १०वी आणि १२ वी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी बक्षीस वितरण त्यांनी केले. व गावाच्या विकासासाठी सौर ऊर्जेचे लाईट गावभर बसवले असे अनेक विविध कामे त्यांनी केले.

           आयुष्यामध्ये अनेक शैक्षणिक ,धार्मिक विकासाच्या कामामध्ये मोठा हातभार लावला व आयुष्य स्वतः जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं या प्रमाणे सुंदर जीवन जगले व वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

           त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा श्री. संजय चोपडा,सुना ,नातू श्री .अक्षय चोपडा श्री .अनिकेत चोपडा असा मोठा परिवार आहे.

           त्यांच्या निधनाने त्यांच्या जन्मगावी ग्रामपंचायत देडगाव व ग्रामस्थ देडगाव यांच्या वतीने तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव व अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देडगाव. यांच्या वतीने शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

    यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे ,साखर कारखान्याचे विद्यमान संचालक जनार्दन कदम, खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे ,माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे , ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके,देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे , माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे ,माजी उपसभापती कारभारी पाटील चेडे ,माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,सोसायटीचे विद्यमान चेअरमन महेश कदम ,जनार्दन तांबे ,पांडुरंग महाराज रक्ताटे ,बन्सी वांढेकर ,आजिनाथ आठरे ,बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, युवा नेते किशोर वां ढेकर ,कडूभाऊ दळवी , बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रामभाऊ कुटे, सूर्यभान सोनवणे ,फक्कड पगारे दाजी, प्रेमचंद हिवाळे टेलर ,चांगदेव मुंगसे ,जिल्हा परिषद शिक्षक बथवेल हिवाळे, योसेफ हिवाळे, बन्सी पाटील मुंगसे, भाऊराव मुंगसे सर ,सोसायटीचे विद्यमान संचालक सागर बनसोडे ,गणपतराव कोकरे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव चे मुख्याध्यापक सतीश भोसले सर व सर्व शिक्षक वृंद अहिल्याबाई होळकर शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड व सर्व शिक्षक वृंद व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

      मोहनलाल चोपडा साहेब जाण्याने देडगाव परिसरतून हळहळ व्यक्त होत आहे.