*राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे टोमॅटो पिकावर मार्गदर्शन*
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत मौजे कोठुरे, ता. निफाड, जि. नाशिक येथे टोमॅटो प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी पिंपळगाव बसवंत येथील कांदा व द्राक्ष संशोधन प्रकल्पातील रोग शास्त्रज्ञ डॉ. राकेश सोनवणे, राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण खैरे, निफाड तालुक्यातील पिंपरी येथील मंडळ कृषी अधिकारी श्री. जनार्दन क्षीरसागर, उप कृषी अधिकारी श्री.तुळशीदास खेमनर व सहायक कृषी अधिकारी श्री. योगेश पाटील हे उपस्थित होते. यावेळी टोमॅटो पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, मार्केट तंत्रज्ञान, भविष्यातील पीक पद्धती, टोमॅटो पिकावरील समस्या, त्यावरील उपाय, काढणी पश्चात तंत्रज्ञान यावर डॉ. राकेश सोनवणे व डॉ. प्रवीण खैरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना किड रोग व्यवस्थापन घडी पत्रिकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शेती 'शाळेचा मागोवा घेवुन शेती दिनाचे महत्व व टोमॅटो पिकाबद्दल श्री. जनार्दन क्षीरसागर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख व हॉर्टसॅप प्रकल्प प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड व हॉर्टसॅप प्रकल्पाचे समन्वयक डॉ. संजय कोळसे यांचे मार्गदर्शन लाभले.








