बालाजी यात्रा उत्सव निमित्ताने गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट.

बालाजी यात्रा उत्सव निमित्ताने गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट.

बालाजी यात्रा उत्सव निमित्ताने गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांची सदिच्छा भेट.

    नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे धर्मध्वजारोह निमित्ताने श्री .क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली.

      आज पासून बालाजी देवस्थान उत्सवाला ,अखंड नाम सप्ताह ला सुरुवात झाली असून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे.तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .सायंकाळी नामवंत महाराजांची किर्तन सेवा पार पडत आहे. आज महंत सुदर्शनमुनी महाराज उदासीन यांची कीर्तन रुपी सेवा सायंकाळी 7 ते 9 पार पडणार आहे.

        यावेळी महाराजांनी बालाजीचे मनोभावे दर्शन घेतले तसेच मंदिर परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी बालाजी मंदिर सभागृह येथे ऐनवेळी कार्यक्रम पार पडला.

       बालाजी देवस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराज, ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, ह भ प सदाशिव महाराज पुंड, ह भ प पाटेकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला.

     तर या वेळेस महाराज बोलताना म्हणाले की देवस्थान अतिशय वैभवशाली असून मला बालाजीरायानेच दर्शनाला बोलावले आहे.निसर्गाने जो हाहाकार चालवला आहे त्यातून सर्वांची जीवाची मुक्तता व्हावी. सर्वांची संकट दूर व्हावे व मानव जीवताला धोका होऊ नये .गोमातेचे रक्षण व्हावं अशा गोष्टीसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी. भगवंत सर्वावर कृपा करील असे यावेळी महाराज आशीर्वाद रुपी बोलले.

    यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव , विश्वस्त सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, व्हाय चेअरमन, संचालक ,विविध शाखेचे पदाधिकारी ,भजनी मंडळ व देडगाव ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.