गुरु परंपरेनुसार दत्त मंदिर संस्थान, श्रीक्षेत्र देवगड येथे उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळ्याचे आयोजन.
प्रतिनिधी:-खेडले परमानंद ,नेवासा
सनातन वैदिक रीतीरिवाजाप्रमाणे
बाल संन्यासी गुरुवर्य किसनगिरी बाबा, गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या ग्रुप परंपरेनुसार
श्रीक्षेत्र देवगड संस्थान चे उत्तराधिकारी म्हणून महंत गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांनी कृष्ण महाराज मते यांची निवड केली असून गुरु परंपरेनुसार श्री कृष्णा महाराज मते यांचा उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळा मिती वैशाख शु ll५ शके १९४४, शुक्रवार दिनांक ०६/०५/२०२२ या शुभ दिनी
श्री श्री श्री १०८ धर्मनिष्ठ राजगुरू दत्तात्रेयरत्न अनंत विभूषित परीवज्रकाचार्य महामंडलेश्वर महाराष्ट्र पीठाधीश्वर महान तपस्वी शिवानंदगिरीजी महाराज ,श्रीक्षेत्र मंजूर तालुका कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व महंत देवेंद्र गिरीजी महाराज ,
.गुजरात, श्रीमंत वेदव्यासपुरीजी महाराज गुजरात, महंत इंद्रजीत भारतीजी महाराज अध्यक्ष गिरणार मंडल गुजरात, श्री महंत सेक्रेटरी नारायण नारायणगिरीजी महाराज गाजियाबाद उत्तर प्रदेश ,गुरुदास भास्करगिरीजी महाराज यांच्या तसेच परिसरातील सर्व संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. सर्व पक्षी मान्यवरांची उपस्थिती राहील.
सोहळ्याची रूपरेषा :-
१) दीक्षित व्यक्तीचे खोर कर्म.
२) अग्निहवन
३) पवित्र जलाभिषेक
४) पंचगुरू संस्कार विधी
५) संस्कार यथा विधी पंडित वेदशास्त्रसंपन्न श्री गणेश गुरु ज्ञानेश्वर नगर यांच्या पौराहित्य खाली वेदवाणी ने होणार आहे.
तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे असेल.
सकाळी ८ ते ११:-यज्ञ मंडपामध्ये होमहवनादी नामकरण विधी कार्यक्रम होईल.
९ ते ११ हरी किर्तन श्री महंत कैलास गिरी महाराज. गिरी आश्रम सावखेडा.
११ते साडे ११.३० पूजनीय संतांचे व मान्यवरांचे शुभ संदेश व बम ब्रह्मवृंदाचा शांतीपाठ,
श्रींची महाआरती तद्नंतर महाप्रसाद.
असे या उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळ्याचे स्वरूप असेल.
अशी माहिती दत्त मंदिर संस्थान चे मठाधिपती गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांनी दिलेली आहे. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.
व अशा अद्वितीय ,अविस्मरणीय
सोहळ्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा.