महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न .

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न* 

 

*राहुरी विद्यापीठ, दि. 20 ऑक्टोबर,2023*

 

           महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अहमदनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुधाकर बोराळे, आत्मा अहमदनगरचे प्रकल्प संचालक श्री. विलास नलगे, राहुरी येथील सेंद्रिय शेती प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. उल्हास सुर्वे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, आत्मा अहमदनगरचे प्रकल्प उपसंचालक श्री. राजाराम गायकवाड, विस्तार शिक्षण संचालनालयाचे सहाय्यक प्राध्यापक व जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन, जुन्नर येथील शाश्वत शेती फाउंडेशनचे श्री. सुजित पाटे, सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक श्री. दीपक नलावडे उपस्थित होते. 

       

               यावेळी डॉ. सी. एस. पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीमध्ये मधमाशी पालनाचे महत्त्व खूप असून याकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या आहारामध्ये आपण जर पौष्टिक तृणधान्याला महत्त्व दिले तर अनेक रोगांपासून तसेच विकारांपासून आपण दूर राहू शकतो ही वस्तुस्थिती आहे. तरी सर्वांनी आपल्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा समावेश केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती उपक्रमाचा आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. उल्हास सुर्वे यांनी जैविक निविष्ठा केंद्र उभारण्याची सविस्तर माहिती दिली.श्री. विलास नलगे,श्री. किरण डुमरे यांनी सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यावर मार्गदर्शन केले. श्री. सुजित पाटे यांनी जैविक निविष्ठा केंद्र उभारणी तर श्री. दीपक नलावडे यांनी आपले सेंद्रिय शेतीचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुधाकर बोराळे यांनी केले. श्री. राजाराम गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.