नेवासा तालुक्यातील माका येथे आजपासून मकावंती देवीचा यात्रा उत्सवाचे आयोजन.

नेवासा तालुक्यातील माका येथे आजपासून मकावंती देवीचा यात्रा उत्सवाचे आयोजन.

माका येथे आजपासून मंकावती देवीचा यात्रास्तोव 

    माका (प्रतिनिधी आदिनाथ म्हस्के ):- नेवासा तालुक्यातील माका येथील जागृत ग्रामदैवत मंकावती देवीचा यात्रा उत्सव गुरुवार दिनांक 25/01/2024 पासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुरूवारी सकाळी 9 वाजता प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगा जलाची गावामधुन वाजत गाजत मिरवणूक काढून त्या गंगाजलाने देवीचा अभिषेक होणार आहे. त्यानंतर प्रत्येक घराघरातून देवीला पुरणपोळी व साडीचोळीचा नैवद्य वाजत-गाजत अर्पण केला जातो .रात्री 8 वाजता देवीचा छबिना (पालखी) मिरवणूक काढण्यात येनार आहे .छबिण्यासमोर फटाके व दारूचीआतषबाजी करण्यात येत असते . त्यावेळी परिसरातील नागरिक व महिलांची प्रचंड गर्दी होत असते.संध्याकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे

         दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी गावातील हनुमान मंदिरासमोर सविता राणी पुणेकर व नामवंत कलाकारांचा हजेरीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. व दुपारी 2 वाजता राज्यातील नामवंत पैलवानांचा जंगी हंगामा होणार आहे.

    यात्रा उत्सवामुळे मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे .तरी परिसरातील नागरिकांनी या यात्रेचा आनंद घ्यावा अशी विनंती जगदंबा देवी ट्रस्ट व यात्रा समितीच्या वतीने कळविण्यात येत आहे.