राहुरी वळण रस्त्यावर मानोरी शिवारात रस्त्याच्या मधोमध असलेल्या फांदीमुळे अपघाताची शक्यता ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष .

प्रतिनिधी //वळण//
गेल्या पाच दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राहुरी वळण रस्त्यावर मानोरी शिवारात मोरे वस्ती जवळ गोड्या बाभळीच्या झाडाची फांदी मोडून रस्त्यावर पडलेली आहे.
त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे.
रात्रीच्या वेळी अनेक जण या रस्त्यावर असलेल्या काट्याच्या फांदीत घुसून जखमी झाले आहेत.
या गोष्टीला चार ते पाच दिवस उलटूनही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष असतानाचे चित्र दिसून येत आहे.
मोडलेली सदरची फांदी रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून समोरच्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची दाट शक्यता आहे ,तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीची दखल घेऊन त्वरित फांदी काढावी व रस्ता मोकळा करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकां कडून होत आहे.