तांभेरे येथील निळा झेंडा प्रकरणी २९ आरोपींना पूढील सहा महिने ट्रायल कोर्टात हजर राहाण्याची गरज नाही.

तांभेरे येथील निळा झेंडा प्रकरणी २९ आरोपींना पूढील सहा महिने ट्रायल कोर्टात हजर राहाण्याची गरज नाही.

तांबेरे येथील निळा झेंडा प्रकरणी आरोपींना पुढील सहा महिने ट्रायल कोर्टात हजर राहण्याची गरज नाही. माननीय औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय. .. आरोपींचे वकील ॲड. श्री सुरेश दिनकरराव तांबे यांची माहिती....समजलेली माहिती अशी की मागील वर्षी दिनांक १२/०४/२०२२ रोजी राहुरी तालुक्यातील तांभेरे गावामध्ये निळा झेंडा लावण्याच्या वादातून गावात ड्युटीवर असलेल्या ज्ञानदेव गर्जे या पोलीस कर्मचाऱ्याला 34 महिला पुरुष सर्व राहणार तांभेरे तालुका राहुरी यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानदेव गर्जे यांच्या फिर्यादीवरून वरील सर्व 34 पुरुष व महिला मागासवर्गीयांवर भा.द. वि. कलम 353, 332, 143, 147, 149, 504, 283, व मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 143, 103 नुसार सी आर नंबर 291/2022 चा गुन्हा दाखल केलेला होता. तसेच तांभेरे येथील तत्कालीन ग्रामसेविका सोनाली भाऊसाहेब पाटोळे यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे सदर आरोग्यविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 53 (5) व भा .द. वि. कलम 447 188 नुसार वरील सर्व आरोपींविरुद्ध सी. आर . नंबर 295/2022 चा गुन्हा दाखल केलेला होता. त्यापैकी 14 आरोपींना दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी अटक केली होती. सदर आरोपींची सुमारे 23 दिवसानंतर जामीनवर सुटका करण्यात आली होती. या सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांनी राहुरी येथील न्यायालयात दोन वेगवेगळे आरोप पत्र दाखल केले असून सदर आरोप पत्रास 34 आरोपींपैकी 29 आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनलॲप्लीकेशन नंबर 2647/2022 नुसार आव्हान दिले आहे. सदर प्रकरणात सरकार पक्ष व इतर गैर अर्जदार वकिलामार्फत हजर झाले असून सदर प्रकरणी दिनांक 21 जुलै 2023 रोजी माननीय औरंगाबाद खंडपीठा समोर सुनावणी झाली असता माननीय उच्च न्यायालयाने अशोक बाबुराव तांबे, राजू आनंदा तांबे, मार्तंड माधव तांबे, दीपक दिनकर तांबे, शुभम अंतोन तांबे, स्वप्निल भारत तांबे, प्रसाद सुधाकर तांबे, रेखा बाळासाहेब तांबे, चित्रा बाळासाहेब तांबे, मंगल बाबासाहेब तांबे, नंदा अशोक तांबे, नीता प्रभुदास तांबे, अर्चना संजय तांबे, मिनाबाई मार्शल तांबे, भाग्यश्री उत्तम तांबे, रंजना रावसाहेब तांबे, मोनिका अशोक तांबे, अनिता एकनाथ तांबे, संगीता अंतोन तांबे, उषा दादू तांबे, लतिका माधव तांबे, सविता संतोष तांबे, छबु बाळासाहेब तांबे, नीता बाई विजय तांबे, दादासाहेब प्रल्हाद कांबळे, अजित पोपट तांबे, चंद्रकांत गोरख तांबे, रावसाहेब बाबुराव तांबे, अक्षय अशोक तांबे या 29 आरोपींना ट्रायल कोर्टात आजपासून पुढील सहा महिने पर्यंत हजर राहण्याची गरज नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सदर प्रकरणी आरोपींच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड .राहुल जोशी (औरंगाबाद) यांनी माननीय न्यायालयासमोर भक्कम बाजू मांडली. त्यांना ॲड .सुरेश दिनकरराव तांबे (तांभेरे), ॲड .मडकर (औरंगाबाद), ॲड .झाल्टे साहेब (सिल्लोड) व रिपब्लिकन सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष माननीय राजूभाऊ आढाव हे सहकार्य करीत आहेत.