ता.राहुरी येथील नगर परिषद अधिकारी जोमात व वार्ड क्र. ११ मल्हारवाडी रोड कोमात....
आज दिनांक १४/७/२०२२ रोजी (बहुजन महिला ग्रामिण विकास संघाच्या) उपाध्यक्ष अँड. मनिषा लाला पंडित यांनी राहुरी नगरपरिषद या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी विकास घटकाबंळे सर यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये मल्हारवाडी रोड सातपीर बाबा दर्गा भुजाडी इस्टेट मधील वार्ड क्रमांक 11 मधील रस्त्याची अत्यंत वाईट आणि बिकट अशी रस्त्याची दूरदर्शा झालेली आहे रस्त्यावर ठीक ठिकाणी लहान मोठे खड्डे झालेले आहेत आणि सदरच्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जाऊन रस्त्याची अतिशय वाईट आणि धोकादायक परिस्थिती झाली आहे त्यामुळे नागरिकांना रस्त्याने ये ,जा करणे अत्यंत कठीण झालेल आहे त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आलेले असून सदरील रस्त्याचे डांबरीकरण आणि खडीकरण तत्काळ करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले सदरील निवेदनामध्ये वार्ड क्रमांक 11 मधील सर्वच नागरिकांच्या सह्या आहेत त्यामध्ये सौ रेखा कदम, सौ रंजना भागवत वाघमोडे ,चंदनमल मुथा ,सौ पल्लवी भालेराव, सौ सुनीता झांबरे ,सौ अंजना अशोक शेळके ,असलम खान अश्रफ खान पठाण ,सौ सुधा सागर वाघमारे ,सौ आसमा रफिक शेख ,एलीयास समशेर खान पठाण, सोनवणे सम्राट अशोक, सौ यास्मिन मुन्नवर कादरी ,मधुकर रामचंद्र थोरात ,मोहम्मद युसुफ मुसानि ,सौ शोभा भाऊसाहेब ढोकणे ,सत्रे बाबासाहेब रघुनाथ ,तोफिक निसार पिंजारी ,सिंधुताई जनार्दन राऊत, डमाल चंद्रकला, कल्याण मारुती राऊत, विनोद कुमार लाला पंडित, नंदलाल तुकाराम भुजाडी, आकाश नंदलाल भुजाडी या सर्वांच्या सह्या असून सदरील रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण तत्काळ करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे अँड. मनिषा लाला पंडित , सौ वच्छला पातोरे यांनी तसेच वार्ड क्रमांक 11 मधील सर्व नागरिकांनी केली आहे ...