आज पासुन बारावीची परीक्षा सुरु ,अनुसूचित प्रकार घडू देणार नाही .- मुख्याध्यापक स्वरुपचंद गायकवाड.
देडगाव बालाजी (प्रतिनिधी)शासनाच्या नियमानुसार दरवर्षी प्रमाणे शालेय विभागांच्या नियमानुसार आज दि.४ पासुन सर्वत्र बारावी ची परिक्षा सुरु होत आहे.
आज नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्य विद्यालय येथे बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थी अगदी तयारी करून आहेत. भविष्याच्या उज्वल ते करता या शालेय परीक्षा बोर्डावर अगदी शांतता पूर्वक वातावरण आहे . अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य स्वरुपचद गायकवाड सर यांनी वेळोवेळी पालकाला दिलेल्या सूचनेनुसार कोणतीही पालक परीक्षा बोर्डाकडे फिरकले नाही . मुलाच्या भविष्य करता आम्ही कटिबद्ध आहोत. यामागील काळातही या शाळेचा उच्चांक निकाल आहे. त्यामूळे सर्व मुलानी काटेकोर प्रमाणे या नियमाचे पालन करावे असे आवाहन करत मुलांना शुभेच्छा दिल्या .त्यामुळे वातावरण अगदी आनंदाचे आहे.
या बारावीच्या बोर्डाचे नावलौकिक राहावे व या गावाचे नाव आदर्शमय व्हावे म्हणून यासाठी मुळा एज्युकेशन चे संचालक बाजीराव पाटील मुंगसे, मा. उप सभापती कारभारी चेडे, विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, उप सरपंच लक्ष्मणराव गोयकार, जेष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अभिजीत ससाने, प्रगशिल शेतकरी चंद्रभान कदम,माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मुंगसे व अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्य विद्यालय चे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद आदींनी विशेष यामध्ये सहभाग घेऊन अधिक कष्ट घेतले. यावेळी कुकाना पोलीस स्टेशन चे पो . कॉं.खेडकर दादा व कोलते दादा यानी यावेळी हजेरी लावून चोख बंदोबस्त ठेवला.