सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 21 मार्च जागतिक वन दिन साजरा .

सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 21 मार्च *जागतिक वन दिन* साजरा करण्यात आला.राहुरी तालुक्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा यांची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली. निबंध आणि चित्रकला स्पर्धा राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिरात पार पडली . याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभाग प्रक्षेत्र राहुरीच्या लागवड अधिकारी *श्रीमती शुभांगी धोटे* यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक तरी झाड घरी लावावे म्हणजे खऱ्या अर्थाने जागतिक वन दिवस साजरा केला याचा आनंद आपल्याला होईल .
उन्हाळ्याच्या काळातच हा वन दिन येतो याचे कारण असे की उन्हाळ्यात सावलीचे महत्त्व लोकांना कळतं उन्हाळ्यात सावली शोधणा-या लोकांनी पावसाळ्यात झाडे लावली पाहिजेत असे प्रतिपादन याप्रसंगी लागवड अधिकारी श्रीमती शुभांगी धोटे यांनी केले .कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे *उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे* म्हणाले की जंगल हे जंगल नसून ती पृथ्वीची फुफ्फुसं आहेत तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे हे फक्त झाडे नाही तर फिल्टर जाळया आहेत आपणा सर्वांना आॅक्सिजन देणाऱ्या झाडांची किंमत आपण दवाखान्यात बेडवर जातो तेव्हाच कळते म्हणून बालवयात झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा हा संस्कार म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याप्रसंगी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले.
घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथील *कु.सायली पंडित हजारे* ही प्रथम , छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवराचा *चि.विराज बळवंत कदम* दुसरा क्रमांक, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथील *कु.कार्तिकी अविनाश सोनवणे* ही तृतीय तर सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय विद्यालयाची *कु. आस्ता आप्पासाहेब नरवडे* हीचा उत्तेजनार्थ क्रमांकाने आला.
चित्रकला स्पर्धेत छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा येथील *श्रावणी संदीप गाडेकर* प्रथम, सौ.भागिरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक विद्यालयची *चैताली गणेश चव्हाण* दुसरी, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरीचा *सोहम संदीप नवले* हा तृतीय क्रमांकाने तर आदर्श माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी येथील कु.*ढोकणे आदिती अशोक* हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सर्वांना गौरविण्यात आले.याप्रसंगी कला अध्यापक प्रकाश साबळे,वनपाल श्री. रविंद्र आत्माराम भोपी , श्री. अतुल दत्तात्रय बोरूडे ,वनरक्षक बाळू श्रीधर सुंबे ,सचिन नामदेव थोरात ,तुकाराम जाधव,संभाजी ढोकणे,मुसमाडे सर सुर्यवंशी सर,ढोके सर इ.उपस्थित होते.