17 लाख 78 हजार 316 रुपये किमतीचा सीमेंट रस्ता बसला धूळ खात !!

प्रतिनिधि वाहिद शेख यांची विशेष बातमी - सावनेर:6 दिसंबर :--

17 लाख 78 हजार 316 रुपये किमतीचा सीमेंट रस्ता बसला धूळ खात !!

सावनेर  स्थित वार्ड क्र. 5 मधील सटवामाता मंदिर ते राजन नकाशे यांच्या घरापर्यंतचा 17 लाख 78 हजार 316 रुपये खर्चाचा सीमेंट रस्ता सावनेर नगर परिषद कडून मंजूर करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार
नवीन सीमेंट रस्ता बणविन्याकरिता परिसरातील सामाजिक कार्यकर्ता विनीत पाटिल व  स्थानिक नागरिकांद्वारे प्रभाग सदस्याकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या होत्या.  त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी प्रभाग सदस्य यांच्या प्रयत्नाने नपा सावनेर मार्फत सटवामाता मंदिर ते राजन नकाशे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याला मंजुरी  मिळविन्यात आली.
 नवीन सीमेंट रस्ता बांधकाम करिता निविदा ही काढण्यात आली.  संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे कामही सुरू केले मात्र कासव गतीने काम करत केवळ मुरूम व गिट्टी टाकून पुढील काम त्याच अवस्थेत ठेवण्यात आले.यामुळे टाकन्यात आलेली मुरुम अवकाळी पाउसामुळे वाहून गेली व रस्ते वरील गिट्टी उखडलेली असून रस्तेमध्ये गड्ढे निर्माण झाले त्यामुळे  स्थानिय नागरिकांना रहदारीला ये-जा करण्यास त्रास होत आहे .
अनेक महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही सिमेंट रस्त्याचे काम जैसे-थे च्या अवस्थेत आहे.
 प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी ह्या अपूर्ण सीमेंट रस्तेच्या कार्याबद्दल संबंधित कंत्राटदार व प्रभाग सदस्य यांच्याकडे या अपुर्ण कामाबद्दल अनेकदा विचारणा केली, मात्र प्रतिसादात आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.
 या समस्येतून मार्ग काढण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी न.प. मुख्याधिकारी सावनेर यांना विलंब न लावता रखडलेले काम सुरू करण्याची मागणी केली असता निवेदन ही दिले आहे. 
ह्या अपूर्ण सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्याची परवानगी मुख्याधिकारी सावनेर कधी देतात , याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

 निवेदन देतांना विनीत पाटिल सह , पवन राऊत, अक्षय आवारी,प्रशांत उके, भूषण आवारी, विकी शेंडे, भरत धुंडूळे, मयूर शेंडे,राहुल नाहरकर,आदेश चरपे, अभिषेक दास, 
आकाश ढोके ,नावेद शेख,सुनील मानकर, अक्षय बिलवार, जयदीप खाटिकर,शुभम चौधरी,  रोहन जारारे, संकेत गमे,सोनू हजारे, शुभम जोगी,मोनू देरकर, अभिषेक साराटे, मुकेश बनसोड ,अक्षय नकाशे,प्रतीक लाटकर,  प्रणय लाटकर,मयूर गाडगे इत्यादि पीड़ित नागरिक उपस्थित होते .
 बीपीएस लाइव न्यूज़ ब्यरो 
     महाराष्ट्र