भिंगार कॅम्प व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, मोटरसायकल चोरणाऱ्या चोरांची टोळी ६,८५,ooo / - रू . किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद.
अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी ६,८५,०००/- रु. किंचे सतरा (१७) दुचाकीसह जेरबंद भिंगार कॅम्प व स्थानिक गुन्हे शाखा पथकची संयुक्त कारवाई .
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, आज दिनांक ०५/०८/२०२२ रोजी पोनि / श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचे आदेशान्वये मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो., नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची आगामी सण उत्सव अनुषंगाने आयोजित बैठकीचे कामकाजा करीता स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात उपस्थित असतांना त्यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे शेख अकिल व त्याचा साथीदार रा. औरंगाबाद असे चोरीची मोपेडवरुन औरंगाबादरोडने अहमदनगरकडे येत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
सदर बातमी प्राप्त होताच पोनि श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन, पथकातील सपोनि / दिनकर मुंडे, सपोनि/शिशिरकुमार देशमुख, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, पोना / ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, भानुदास खेडकर, राहुल व्दारके, पोकों/विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, महादेव निमसे, चापोहेकॉ / संभाजी कोतकर व संजय काळे अशांनी मिळुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी मिळुन नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल सनी पॅलेस येथे जावुन, वेशांतर करुन सापळा लावुन थांबले असतांना एका मोपेडवर दोन इसम येतांना दिसले. पथकास संशय आल्याने पथकाने मोपेडवरील इसमांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्यांनी गाडी जोराने घेवुन नगरच्या दिशेने पळुन जावु लागले. संशयीतांचा पाठलाग सुरु असतांना पथकाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनि / देशमुख यांना सदर घटने बाबत माहिती कळवून संशयीत इसमांना ताब्यात घेणे बाबत मदत घेतली. दरम्यान स्थागुशा पथकाने मोटार सायकल वरील संशयीत इसमांचा पाठलाग करुन दोन्ही संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) शेख अकिल शेख खलील वय ४९, रा. भवानीनगर, जिल्हा औरंगाबाद व २) शेख मंजुर अनिस अहमद वय ३१, रा. भवानी नगर, जिल्हा औरंगाबाद असे असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातील विना नंबर अॅव्हीएटर मोपेड बाबत विचारपुस करता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांचेकडे बारकाईने विचारपुस करता स्टेट बँक, अहमदनगर येथून दोघांनी मिळुन चोरी केले बाबत माहिती दिली. नमुद माहिती वरुन अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हे अभिलेख पडताळणी करता भिंगार कॅम्प पोस्टे गु.र.नं. ५८/२२ भादविक ३७९ प्रमाणे दि.०८/०२/२२ रोजी जीपीओ चौक येथील स्टेट बँके समोरुन एक १५,०००/- रु. कि.ची मोपेडे चोरी गेले बाबत अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल आहे. अशी माहिती प्राप्त झाली. सदर गुन्हा हा ताब्यातील संशयीत इसमांनी केला असले बाबत पथकाची खात्री झाल्याने दोन्ही आरोपींना मद्देमालासह ताल्यान
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना अधिक विश्वासात घेवुन कसुन व बारकाईने चौकशी केली असता त्यांनी अहमदनगर शहर व औरंगाबाद येथे वेळोवेळी दुचाकी चोरी केली असुन चोरी केलेल्या दुचाकी त्यांचा साथीदार नामे ३) मुकर्रम मुस्तफा सय्यद, रा. भवानीनगर, अहमदनगर याचेकडे दिल्याचे सांगितल्याने आरोपी नामे मुकर्रम यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने त्यांचा साथीदार नामे ४ ) आयुब याकुब सय्यद (फिटर) रा. विळद पाण्याचे टाकी जवळ ता. नगर यास विक्रीसाठी दिल्याचे सांगितल्याने त्यास त्याचे राहते घरी जावुन ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने वर नमुद आरोपीने विक्रीसाठी दिलेल्या १७ दुचाकी काढुन दिल्याने आरोपीस मुद्देमाल ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या चारही आरोपीकडे विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यात चोरीस गेलेली १५०००/- रु. कि.ची मोपेड व अहमदनगर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील चोरी केलेल्या १७ दुचाकी ६,८५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
आरोपींकडुन ताब्यात घेतलेल्या दुचाकी पैकी वरील प्रमाणे ०९ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरीत दुचाकी बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.