मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर दि.१५.०८.२०२२ मुळा धरण येथे पाण्याण्याची आवक वाढ होत असलेने मुळा नदी पात्रात पाणी विसर्गात वाढ .

मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर दि.१५.०८.२०२२ मुळा धरण येथे पाण्याण्याची आवक वाढ होत असलेने मुळा नदी पात्रात पाणी विसर्गात वाढ .

दि. *14 ऑगस्ट 2022* रोजी मुळा धरणातून सायंकाळी 5.00 वाजता 2160 क्यूसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.  

        पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने आज दि.15 /8 /2022 रोजी दुपारी 1:00 वाजता विसर्गात वाढ करून *4320* क्युसेस इतका करण्यात येत आहे. 

आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुळा धरणातून नदीपात्रामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल.

          तरी याबाबत मुळा नदीकाठच्या गावांना या जाहीर आवाहानाद्वारे सूचित करण्यात येते की, नदीपात्रातील चल मालमत्ता , चीजवस्तु ,वाहने, पशुधन , शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

(कु.सायली पाटील)

कार्यकारी अभियंता

मुळा पाटबंधारे विभाग,

अहमदनगर ..