आपटा बांधावरील मनातील भावनेचे सोनं - मेजर शिवाजीराव पठाडे

आपटा बांदावरील मनातील भावनेचं सोनं मेजर :- शिवाजी पठाडे
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण) पारंपारिक समजूती प्रमाने आपाट्याला सोनं म्हटल जात. आपाट्याचे झाडं खर तर शेतातील बांदावरील सोनं आहे .
आम्ही लहान पनी बघायचो दसऱ्याच्या दिवशी वडलाच पाहिलं काम, कुठेतरी तरी जाऊन सोनं घेऊन यायचं. हट्ट करून आम्हीही त्यांच्या सोबत जायचो. सोनं म्हणून तूर व कापसाची एक दोन फांदी, ज्वारीचे एक दोन धाटे, सौंदडीचे एखादी छोटी फांदी, आपट्याची एखादी छोटी फांदी एकत्र करून एक छोटी पेंढी बाधायचे. पेंढी बांधतांना सौंदडीचे काटे टोचणार नाहीत असं बरोबर आतच्या बाजूला घेऊन पेंढी बांधायची. ह्या सगळ्या वनस्पती गोळा करतांना वडील एका एका पाल्याचे महत्व, उपयोग सांगायचे. ही पेंढी घेऊन घरी देव्हाऱ्यात ठेवायची. ही पेंढी, त्यातल्या सर्व प्रकारची पाने आजच्या दिवशी सोनं समजली जायची. संध्याकाळी चार पाचवाजेच्या सुमारास सोनं म्हणजेच ह्या पेंढीमधून काही पाने गावाच्या हनुमान मंदिरात ठेवली जाते. मग हे गावातील सर्व जनांना दिलं जायचं. या निमित्ताने गावातील सर्वांशी भेटणं, त्यांच्या शेत शिवारातील पिकं कशी आहेत याची चर्चा होते.
एक दहा पंधरा वर्षापूर्वी आजच्यासारखी विशेष सवलती, ऑफर, डिस्काऊंट्सचं जाहिरातबाजी तेव्हा नसायचं. सोने खरेदीचाही इतका बोलबाला नव्हता. शेतीमधील पिकं, बांधावरील झाडे ह्यांचीच जोपासना सोन्यासारखं केलं जायचं. पारंपारिक समजुतीप्रमाणे आपट्याला सोनं म्हटलं जातं. आपट्याचे झाड खरं तर शेतीतील, बांधावरील सोनं आहे. आपटा जिथे लावला जातो त्या ठिकाणची माती भुसभुशीत बनते. सुपीक बनते. मातीचा कस वाढतो. जमिनीतील खडक, दगड हे सर्व भेदून जमीन पोकळ करते. आपट्याच्या मुळावर गाठी असतात. आपट्याचे झाड हे द्विदलीय असल्यामुळे त्याच्या मुळावर गाठी असतात. हे गाठी जमीन सुपीक करण्यासाठी उपयुक्त असतात. जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढवण्याचे काम ह्या गाठी करतात. आपट्याचे हे महत्वपारंपारिक समजुतीप्रमाणे आपट्याला सोनं म्हटलं जातं. म्हणून आजच्या दिवशी एकमेकांना आपाट्याची पाने देण्याऐवजी आपाट्याचे एक रोप द्या. व दसरा मोठ्या उत्साहात साजरा करा.
लेखक :- मेजर शिवाजी पठाडे
बालाजी फाउंडेशन अध्यक्ष देडगाव नेवासा
सर्वांना बालाजी फाउंडेशन च्या वतीने विजयादशमी निमित्त (दसरा )शुभेच्छा