*दिव्यांग भवन साठी देवळाली नगरपालिकेला प्रहारचे साकडे.* देवळाली प्रवरा
दि. ४ मार्च
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीमध्ये जवळपास २५० दिव्यांग बांधव असून त्यांच्या विविध प्रयोजनासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेने दिव्यांग भवन बांधून देणेची मागणी देवळाली प्रवरा प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने मुख्याधिकारी अजित निकत साहेब यांना निवेदन देऊन करणेत आली.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रहार दिव्यांग संघटनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सलीमभाई शेख, राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, राहुरी तालुका महिला उपाध्यक्ष धायाताई हारदे, भरत आढाव, कागळे मामा, किर्णाने मामा अदि उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हंटले आहे की, परिसरातील दिव्यांग बांधवांना सभा, समारंभ तसेच बैठक घेणेसाठी दिव्यांग बांधवांची विविध कामे करण्यासाठी कार्यालयाची गरज असून त्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेने या दिव्यांग बांधवांना दिव्यांग भवन बांधून द्यावे अशी विनंती या निवेदनात करणेत आली आहे.
प्रसंगी देवळाली प्रवरा शहर प्रहार दिव्यांग चे अध्यक्ष सलीम शेख यांनी वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देऊन मुख्याधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.