मुळा धरणावरील भ्रष्ट्राचाराचे साम्राज्य उघड करणार भारतीय पत्रकार संघटन
राहुरी तालुक्यातील जिवनदाईनि असनाऱ्या मुळा धरण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे स्थानिक मजुरांकडून समजले आहे या धरणाच्या शेजारीच एका मोठया धनदांडग्याचे मोठे हॉटेल असून त्याची एक मोठी प्रवासी वाहतूक करणारी बोट या धरणात आहे व हि बोट विणा परवाणा असून यामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोणतीही सूरक्षा यंत्रणा या बोटीमध्ये दिसून आलेली नाही या संदर्भात वारंवार सुचना देऊन ही कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही याचा अर्थ चेरी मेरी घेऊनच हा सर्व कारभार येथील अधिकारी करत आहेत हे सिद्ध होत आहे या धरण क्षेत्रावर काम करणारे मजुरांचा पगारही अनेक महीण्यापासून दिलेला नाही या संदभात वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एकमेकांवर टोलवाटोलवी करताना दिसून आले आहेत या धरणावर असलेली जिल्हा परिषदेची जुनि बोट देखील गायब झाली आहे अशा प्रकारचे अनेक प्रकरणे भारतीय पत्रकार संघटणेचे जिल्हा अध्यक्ष तसेच माहीती आधिकारपत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्णा गायकवाड यांचे सहकाऱ्याने उघड होणार आहे तसेच येथील मजुरही यांचे पगार दिले नसले ने रीतसर अर्ज देऊन उपोषण करणार आहेत असे समजते .