बलात्काराच्या आरोपातून तरुणाची 16 महिन्यानी मुक्तता : दर्द से हमदर्द संस्थेतर्फे अँड कदम यांनी आरोपीची बाजू मांडली.

विवाहित महिलेवरील बलात्काराच्या आरोपातून तरुणाची 16 महिन्यानी जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
मुंबई प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
सविस्तर_मालाड - कुरार पोलिस स्टेशनमध्ये एका 26 वर्षीय महिलेने बळजबरीने बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती, तिच्या सांगण्यानुसार एका 21 वर्षीय तरुणाने तिला तिच्या घरापासून जबरदस्तीने पळवून नेऊन झोपडपट्टीच्या परिसरातच बलात्कार केल्याचा आरोप केला होता, सदरील आरोपी हा गरिबीच्या कारणामुळे वकील लावू शकत नव्हता म्हणून गेल्या 16 महिन्यापासून आरोपी हा जेलमध्येच होता.
जेलमध्ये दर्द से हमदर्द संस्थेच्या कार्यकर्त्यांना तो भेटला व सदरील घटनेची हकीगत सांगून कायदेशीर मदत मागितली. संस्थेतर्फे अँड स्वप्निल कदम यांची नियुक्ती करण्यात आली, तर पॅरा लीगल वॉलेंटियर म्हणून वेदिका दळवी यांनी काम पाहिले.
सदरील केस मध्ये 11 ते 12 तासांनी आरोपींनी महिलेला घरी सोडले असा आरोप करण्यात आला होता, परंतु अँड कदम यांनी सत्र न्यायाधीश श्री. मोरे यांच्यासमोर असे सांगितले की, सदरील घटना ही दिवसा ढवळ्या घडलेली दिसत आहे, तरीही प्रत्यक्षदर्शी कुठलाही साक्षीदार नाही. तसेच महिलेने कोणतीही आरडा ओरड केलेली नाही, संबंधित महीलेच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत, त्यामुळे सदरील केस खोटी केल्याची शक्यता आहे. आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून कोर्टाने काही अटी आणि शर्ती देऊन जामीन मंजूर केला आहे.
दर्द से हमदर्द संस्थेच्या माध्यमातून बेसहारा व आर्थिक सक्षम नसलेल्या व्यक्तींना निःशुल्क मदत करण्यात येते, तसेच खऱ्या केस मधील आरोपी सुटू नये व खोट्या केस मध्ये विनाकारण कोणीही अडकला जाऊ नये यासाठी संस्था कायदेशीर मदत देण्याचे काम करते असे संस्थेचे दिंडोशी कोर्ट प्रमुख अँड नितीन हजारे यांनी सांगितले.