महावीर जयंती ने नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव नगरी दुमदुमली. मोठ्या उत्साहात झाली जयंती साजरी.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देडगाव नगरीमध्ये भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नेवासा तालुका जैन संघाने देडगाव येथील सुभाष सेठ चोपडा, सुनील शेठ मुथा, नंदकुमार मुथा ,सतीश शेठ मुथा, बाळासाहेब चोपडा, राजकुवर गुगळे भाभी या मान्यव रावर या धार्मिक कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती .अगदी तन,मन,धनाने यांनी पार पडली.

      ४० वर्षांनी या देडगाव येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.   हे गावच भाग्य आहे अशी गावच्या सर्वाची चर्चा आहे. अशी जयंती कायम व्हावी हाच मानस सर्वांनी व्यक्त केला.

सकाळी८ते ९ या वेळेत भगवान महावीरांचा रथ गावभर मिरवण्यात आला. यामध्ये जैन संघाच्या महिलांनी डोक्यावर कलश घेत मिरवणुकीची शोभा वाढवली .या कार्यक्रमासाठी देडगाव व परिसरातील जय हरी बालाजी भजनी मंडळ यांनी भगवंताच्या नामाचा जयघोष करीत टाळ-मृदुंगाच्या तालात संपूर्ण देडगाव नगरी दुमदुमली. यामध्ये महीलाच्या फुगड्या झाल्या .भव्य मिरवणुकीत सर्व जाती धर्मांना नी एकोपा राखत मिरवणुकीत सहभागी होऊन या मिरवणुकीची शोभा वाढवली. भगवान महावीराच्या घोषणा देत ही मिरवणूक गावभर अतिशय शांत वातावरणात पार पडली.

         मिरवणूक नंतर बालाजी मंदिराच्या सभागृहात सर्व मान्यवर विराजमान झाली. हा कार्यक्रम जैन साध्वी उदयन प्रभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. या कार्यक्रमामध्ये गाव गावची वेगवेगळी नृत्य पथक भगवान गीत या वेळेस मोठ्या प्रमाणात सादर करण्यात आली. भगवान महावीराचा जन्माचा प्रतेय या सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू व आकर्षण ठरले.

         यावेळी काही प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये मा.सभापती सुनीता ताई गडाख ,मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे, ह भ प सुखदेव महाराज मुंगसे , ह भ प . सैदू महाराज पुंड , बालदेवा तांदळे,माजी संचालक बाजीराव पाटील मुंगसे ,सरपंच चंद्रकांत मुंगसे, उप सरपंच लक्ष्मणराव गोयकार, पत्रकार बन्सी भाऊ एडके , पत्रकार विष्णु मुंगसे, पत्रकार युनूस पठाण आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या निमित्त रक्तदान शिबिर व नेत्रदान शिबिर आयोजित केले होते.

        या कार्यक्रमासाठी नामदार शंकराव गडाख पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने सुनिताताई गडाख यांनी महावीर जयंतीच्या सर्व जैन बांधवांना व सर्वांना शुभेच्छा दिल्या .जैन धर्म हा अतिशय शांत ,संयमी ,नम्रतेचा असणारा हा धर्म आहे या समाजाचा आदर्श सर्व समाजाने घ्यावा या शब्दात आपली भावना व्यक्त केली. तसेच देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे ,सुखदेव महाराज मुंगसे यांनीही या कार्याला शुभेच्छा दिल्या.

       यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जैन साध्वी उदयन प्रभाजी महाराज साहब यांनी आपल्या मधुर वाणीतून

भगवान महावीर यांचे पाच तत्वे आहेत अहिंसा- सत्य -अस्तेय -व्याभिचार आणि अपरिग्रह. भगवान महावीर यांनी अहिंसेवर जास्त भर दिला. जीव हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये असे संदेश जनजनात पोहोचून सांगितले. या प्रतिज्ञेच्या पलीकडे त्यांनी आचरण, विश्वास आणि ज्ञान त्याच्यावर जास्त भर दिला. त्यांनी सांगितले की दुसऱ्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास घ्या, दुसऱ्याला दुखी करू नका, प्राणीमात्रांवर दया करा असे संदेश दिले. त्यांनी "जिओ और जिने दो" हा महत्वपूर्ण संदेश दिला.

       या कार्यक्रमास सचिन भाऊ देसरडा, जैन संघाचे नेवासा तालुका प्रमुख संतोष शेठ ओस्तवाल, शिवसेना तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे , ग्रामपंचायत सदस्य अनिकेत भाऊ मुथा, अशोकराव मुंगसे, माजी सभापती कारभारी चेडे माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे ,मार्केट कमिटी सदस्य कडूभाऊ तांबे , मा सरपंच दत्ता पाटील मुंगसे,नवनाथ महाराज मुंगसे,बजरंग दल अध्यक्ष व सर्व सदस्य कैलास नाथ मित्र मंडळ अध्यक्ष व सर्व सदस्य ,

बालाजी भजनी मंडळ सर्व महाराज मंडळी व सर्व भजनी मंडळी व सर्व नेवासा तालुका जैन संघ उपस्तीत होते.

       या कार्यक्रम निमीत्त प्रसाद रुपी भोजनाचा आनंद सर्वांनी घेतला.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटवा व वैशालीताई चोपडा यांनी केले .तर कार्यक्रमाचे  वेळी आम्हा देडगाव करावर आपण जी काही जबाबदारी दिली त्याबद्दल नेवासा जैन संघाचे आभारी आहे. व कायम आमच्या गांवात जयंती करावी हिच सदिच्छा व्यक्त करते. या शब्दात संगीता ताई नंदकुमार मुथा यांनी सर्वाचे आभार मानले.