मुलांसाठी आदर्श जग निर्माण करण्यापेक्षा आपण मुलासाठी आदर्श व्हावे - न्या. संजना जागुष्टे
मुलांसाठी आदर्श जग निर्माण करण्यापेक्षा आपण मुलांसाठी आदर्श व्हावे-न्या संजना जागुष्टे.
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,
आव्हाणे बु: मानवाधिकार म्हणजे कुणालाही त्रास न देणे व कुणाच्या त्रासाचे कारण न बनणे हे आपला कायदा आपल्याला शिकवतो त्यासाठी आपल्या देशातील कायद्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे यासाठी मुलांसाठी आदर्श जग निर्माण न करता स्वतःत्यांचा आदर्श बनणे गरजेचे आहे उद्याचे नागरिक म्हणून आपल्याला रॅगिंग प्रतिबंधक कायदे आणि वाहतुकीचे नियम माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे असे मत शेवगाव न्यायालयाच्या न्यायाधीश संजना जागुष्टे यांनी शेवगाव तालुका विधी सेवा संघ व शेवगाव तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालयात आयोजित रॅगिंग प्रतिबंधक कायदा व वाहतुकीचे नियम विषयक जनजागृती शिबीर प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमपूजन करण्यात आले.तालुका वकील संघाचे अध्यक्ष कारभारी गलांडे यांनी विद्यार्थी जीवनात चुकून घडलेल्या गुन्ह्यामुळे शिक्षा मिळावी यापेक्षा रॅगिंग व वाहतुकीचे नियम याविषयी कायदेशीर ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे हा मुख्य हेतू सदर शिबीर अयोजनामागे आहे असे मत मांडले.
शेवगाव तालुका वकील संघाचे सदस्य ॲड दादासाहेब शेळके यांनी महाराष्ट्र रॅगिंग कायदा १९९९ यानुसार गुन्ह्याचे स्वरूप आणि होणारी शिक्षा आणि विद्यालय पातळीवर यासाठी करावयाची कार्यवाही याविषयी मार्गदर्शन केले.ॲड शिंदे यांनी देशाच्या प्रगतीसाठी रस्ते विकासाबरोबर वाहतुकीचे नियम,वाहन चालवताना किंवा प्रवास करताना घ्यावयाची काळजी तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणारे नुकसान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी जीवनाच्या गतिमानतेत क्षणोक्षणी कायद्याचे पालन करणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जीवन जगणे महत्वाचे आहे असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम वाबळे यांनी तर पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी शेवगाव तालुका न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजना जागुष्टे,विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे पर्यवेक्षक सुनील जायभाये शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष कारभारी गलांडे ॲड विनायक आहेर ॲड ताठे भाऊसाहेब ॲड डी ए शेळके ॲड बी आर शिंदे ॲड कराड ॲड बुधवंत यांचेसह तालुका वकील संघाचे सदस्य,विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थि
त होते.....