आमदार निलेश लंके यांचा वाढदिवस राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विधायक कामाने केला साजरा.
पारनेर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पारनेर तालुक्याच्या वतीने शिरूर येथील माहेर स्नेहसदन येथील आश्रमाला रोख रक्कम देऊन साजरा करण्यात आला.
लोकनेते निलेश लंके हे सामाजिक बांधिलकी जपणारे नेते म्हणून राज्याला नव्हे तर देशाला परिचित आहेत,कोरोना काळातील त्याच्या कामाची दखल ही जागतिक पातळीवर घेतली गेली.
आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सामाजिक उपक्रम राबविले पाहिजे आशा सूचना दिल्या होत्या त्याचच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे पारनेर तालुका अध्यक्ष तुषार बोरगे यांनी सांगितले.
यावेळी संजय सोनवणे,दीपक जाधव, आकाश गायकवाड, नितीन मुरकुटे,प्रवीण साळवे,सचिन आल्हाट,रामा साळवे,शैलेश रोकडे,शशिकांत कनींगध्वज,अतुल भंडलकर ,सुरज खरात,तेजस अवचार,शांताराम वाघ,योगेश वाघमारे, यासह राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते!