संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त शांतीब्रह्म ह भ प भास्करगिरी महाराजांची सदिच्छा भेट.

संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त शांतीब्रह्म ह भ प भास्करगिरी महाराजांची सदिच्छा भेट.

बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील आदर्श तांबे वस्तीवरील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सप्ताह निमित्ताने श्री. क्षेत्र देवगडचे महंत ,शांतीब्रह्म ,गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सावता मंदिर देवस्थानच्या वतीने महाराजांचा

सन्मान करण्यात आला.

            यावेळी महंत भास्करगिरी महाराज बोलताना म्हणाले की, अतिशय देखने मंदिर व मंदिराचा भव्य दिव्य कळस आणि मंदिरामध्ये तेजस्विनी विठ्ठल, रुक्मिणी व संत सावता महाराज यांच्या मुर्त्या अतिशय मन प्रसन्न करून टाकणारे ही वास्तू आहे. तरी या पवित्र मंदिराचे पावित्र्य कायम राखा असे आवाहन केले.

         या सप्ताह निमित्ताने नामांकित महाराजांची किर्तन सेवेचे आयोजन केले आहे .. सकाळी ज्ञानेश्वर पारायण सोहळा व तदनंतर महाप्रसाद सायंकाळी हरिपाठ तर नंतर कीर्तन यानंतर रात्री महाप्रसाद असे दैनंदिन नियोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत आहेत.

           या शुभेच्छा भेटीदरम्यान ह भ प बाळू महाराज कानडे,पंचायत समितीचे मा. उपसभापती कारभारी चेडे, विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच मच्छिंद्र मामा कदम ,बजरंग दलाचे उपाध्यक्ष शिवाजी काजळे, युवा नेते संभाजी काजळे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील काका मुथा, सोसायटीचे संचालक जनार्दन देशमुख व आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        या अखंड हरिनाम सप्ताहासाठी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे ,सदाशिव महाराज पुंड व तांबे ,तिडके परिवार व ग्रामस्थ मोलाचे कष्ट घेत आहेत.