महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी राहुरी तहसीलवर मोर्चा .

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी राहुरी तहसीलवर मोर्चा .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी राहुरी तहसीलवर मोर्चा*

*राहुरी विद्यापीठ, दि. 17 मार्च, 2023*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डी.सी.पी.एस. धारक कर्मचारी हे दि. 14 मार्च पासून जुनी पेन्शन योजना लागु व्हावी या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. विद्यापीठातील डीसीपीएस/ एमपीएस धार कर्मचाऱ्यांनी एक मिशन जुनी पेन्शन असे आशियाच्या टोप्या घालून व हातात फलक घेऊन संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथून विविध संघटनांचे सोबत एकत्रित येऊन नवी पेठ, शनि चौक मार्गाने तहसील कार्यालय राहुरी येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात दिव्यांग कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. यावेळी झालेल्या सभेमध्ये दोन वर्षांपूर्वी निवृत्त दिव्यांग कर्मचारी श्री. तोडमल यांनी आपली व्यथा मांडली. त्यांना अद्याप पर्यंत कोणतेही सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक, राहुरी यांना निवेदन दिले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ समन्वय संघाचे श्री. महेश घाडगे, दत्तात्रय कदम, गोरक्षनाथ शेटे, देविदास घाडगे, पांडुरंग कुसळकर, संजय गायकवाड, डॉ. सचिन मगर, डॉ. अवधूत वाळुंज, डॉ. प्रकाश मोरे, सिद्धार्थ साळवे, जयदीप खळेकर, दीपक औटि, महेश तमनर, गणेश धोंडे, आप्पा चोपडे, सौ. वैशाली तोडमल, शितल जगदाळे, कावेरी सोनवणे, रेखा गोसावी यांनी सदर मोर्चा शांततेच्या मार्गाने नेण्याचे नियोजन केले होते. सदरचे आंदोलन महात्मा फुले कृषी विद्यापीठ समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले

.