महात्मा फुले कृषी विद्यापीठात 55 अधिकारी व कर्मचारी झाली सेवानिवृत्त .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात 55 अधिकारी व कर्मचारी झाली सेवानिवृत्त .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात 55 अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त*

*राहुरी विद्यापीठ, दि. 31 मे, 2024*

 आज रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठात 45 अधिकारी व कर्मचारी जुन्या पेंशनयोजनेनुसार व 10 कर्मचारी परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजनेनुसार सेवानिवृत्त झाले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांच्या कार्यतत्पतेमुळे विद्यापीठातील 45 अधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी 26 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती विषयक लाभ अदा करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी व त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. यावेळी कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के,उपकुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

 अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. सुनील गोरंटीवार मार्गदर्शन करतांना म्हणाले की सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक लाभ देवून अधिकारी व कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान व्यक्त केले. यावेळी संचालक संशोधन यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कुलसचिव श्री. अरुण आनंदकर मार्गदर्शन म्हणाले की सेवानिवृत्ती म्हणजे सेवेतून निवृत्ती नसून आयुष्यातील परिपक्वता व भावी आयुष्याची नवी सुरुवात आहे. विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेच्या शेवटच्या दिवशी सर्व आर्थिक लाभ देण्यासारखा अनोखा आणि प्रशंसनीय उपक्रम राबविण्याचे समाधान असून याकामी आस्थापना शाखा आणि नियंत्रक कार्यालयाच्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा यापुढेही विद्यापीठाला मिळत राहो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सेवानिवृत्त अधिकरी व कर्मचाऱ्यांचे शाल, श्रीफळ व आंब्याचे रोपे देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. संजय रुपनर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. बाळासाहेब पाटील, श्री. विनोद फुगारे, श्रीमती शैला पटेकर व श्रीमती शिल्पा चतारे यांनी अथक परिश्रम घेतले.