वरवंडीच्या लक्ष्मी देवी यात्रा कमिटीची बैठक बारागाव नांदूर येथे संपन्न, दिनांक11/4/2023 रोजी यात्रेचे आयोजन .
वरवंडीच्या लक्ष्मी देवी यात्रा कमिटीची बैठक बारागाव नांदूर येथे संपन्न, दिनांक 11/4/2023 रोजी यात्रेचे आयोजन .
राहुरी तालुक्यामध्ये सध्या प्रत्येक गावोगावी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणून खरी कसरत होते ती यात्रा कमिटीची.राहुरी तालुक्यामध्ये नावाजलेल्या तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या लगतच असणाऱ्या वरवंडी येथील लक्ष्मी देवीची यात्रा प्रसिद्ध आहे . दिनांक 11/04/2023 रोजी होणाऱ्या यात्रा उत्सवासाठी यात्रा कमिटी सज्ज झाली आहे .लक्ष्मी देवी यात्रा उत्सव यशस्वी पार करण्यासाठी या यात्रा कमिटीची बैठक बारागाव नांदूर येथे संपन्न झाली असून यात्रेचे नियोजनही यावेळी करण्यात आले आहे .
यात्रा उत्सवा दरम्यान कावड मिरवणूक, देवीच्या काठिची मिरवणूक तसेच छबिना रथ मिरवणूक गावापासून ते देविच्या मंदिरापर्यंत करण्यात येणार आहे . भाविकांच्या मदतीसाठी व सुरक्षेसाठी संरक्षक दल स्थापन करण्यात आल्याचे कमिटीतर्फे सांगण्यात आले आहे . यात्रेसाठी लागणारे पाणी, लाईट व स्वच्छता याचेही नियोजन करण्यात आले आहे . या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे व्यसानाच्या आहारी गेलेल्या लोकांना व्यसन मुक्त करण्यासाठी प्रवृत्त करणे हे असणार आहे . यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या बैठकिसाठी अध्यक्ष अंकुश बर्डे (सरपंच),सलीम शेख,अंकुश बर्डे, दीपक बर्डे, शबरी माता अध्यक्ष गैराज माळी, कैलास पवार, अर्जुन माळी, पप्पू बर्डे,अक्षय बर्डे, जालिंदर माळी, संजय बर्डे, जनार्दन माळी, रोहिदास बर्डे, गौतम पवार, सिताराम माळी, शिवाजी माळी, सुनील माळी, दिलीप जगधने, दत्तात्रय शिंदे , अशोक माळी, मुलानी दिलीप शेख, फिरोज पटेल, सलिम शेख, वहिम शेख, वसिम शेख व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.