अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले, चापडगावामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई .
*अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले चापडगाव मध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई*
शेवगाव :- शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे रात्री उशिरापर्यंत गौण खनिज उत्खनन करणाऱ्या एम.एच.१६ सी.सी.२१५३ अशोक लेलँड कंपनीच्या डंपर वर महसूल विभागाने कारवाई केली आहे. दोन दिवसापूर्वीच हसनापूर शिवारात गौण खनिज उत्खनन करणाऱ्या आरोपींनी शेवगावच्या नायब तहसीलदारांसह तलाठीना मारहाण केली होती परंतु तरीदेखील अवैध गौण खनिज उत्खनन चालू असल्याची माहिती मिळताच आपले कर्तव्य बजावण्यासाठी शेवगावचे प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव यांनी ही बाब लक्षात घेता यावर कारवाई करण्याचे निर्णय घेऊन त्वरित त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात आलेली आहे.ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रसाद मते सर व तहसीलदार छगनरावजी वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार रवींद्र सानप व तलाठी कृणाल गोंधळी, महेंद्र शिंदे,संदीप आठरे,सोमनाथ आमने,अमोल हिंगे केदार भाऊसाहेब व सचिन लोहकरे यांच्या पथकाने अनाधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे डंपर चापडगाव येथे पकडले, सदर वाहनाची शासनाच्या महाखनिज ॲप वर तपासणी केली असता गौण खनिज वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना आधळून आला नाही त्यामुळे पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे.
*शेवगाव तालुक्यात चालू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाला लवकरच आळा घालून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व अधिकारी सज्ज असून लवकरच तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन बंद करून दोशींवर वर कारवाई करण्यात येणार आहे.* प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुर
व.