सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम उर्फ मुन्ना शेख यांचा भव्य सत्कार..!!!

सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम उर्फ मुन्ना शेख यांचा भव्य सत्कार..!!!

श्रीरामपूर --
 श्रीरामपूर येथील असणाऱ्या अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजा करीता नेहमी धडपड करणारे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कलेक्शन चे मालक मा.पुरूषोत्तम ( मुन्ना शेख) यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.मा. पुरुषोत्तम ऊर्फ मुन्ना भाई शेख यांचा श्रीरामपूर तालुक्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक , वैद्यकीय तसेच धार्मिक कार्यात फार मोठा सहभाग व मोलाचा वाटा असतो त्यामुळे अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र व श्रीरामपूर व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा कलेक्शन चे मालक मा.पुरूषोत्तम ( मुन्ना शेख) वाढदिवसानिमित्त भव्य असा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे,आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष मुश्ताक भाई तांबोळी, उपाध्यक्ष सुनिल कानडे,खोकर शाखेचे खजिनदार कादिर भाई शेख, जिल्हा संघटक सलिम खाटिक ,करण झंवर इ.श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनचे मा.बंसी फेरवाणी,नक्षत्र कलेक्शन चे मा.अरूण कतारे,शाह कलेक्शन चे संदिप शहा,नितु गारमेंटस चे जजबीर शेख गुलाटी,मनमंदिर कलेक्शन चे मा.अमोलशेठ भुसे, श्रावणी कलेक्शन चे गणेश खैरनार, श्रद्धा कलेक्शन चे तेजस गंगवाल,असे अनेक नामवंत व्यापारी यावेळी हजर होते.

(प्रतिनिधी -- दिपक कदम, बी.पी.एस.लाईव्ह न्यूज ,श्रीरामपूर )