हनुमान माध्यमिक विद्यालय गोंडेगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील हनुमान माध्यमिक विद्यालय मध्ये दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज
जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी पालकांसह विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप फुलारी, अध्यापक गोरक्षनाथ नवले,मारुती धडगे, उमेश मुंढे,भानुदास वाघ,सागर बनसोडे, देवंद्र वाघुळे, वर्षा भोसले, सुवर्णा माळी,बापू गायकवाड,कैलास वाघुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती धाडगे यांनी केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखातील विद्यार्थी, जिजाबाई चा वेशभूषेतील विद्यार्थिनी लक्षावेधी ठरल्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवणावर मुख्याध्यापक संदीप फुलारी,भानुदास वाघ यांनी भाषण केले. सदर कार्यक्रमात सहभागी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची विद्यार्थ्यांना
मोलाचे मार्गदर्शन केले.