शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सौ. अश्विनी कल्हापुरे तर उपाध्यक्षपदी सौ. वैशाली शेळके यांची निवड .

शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सौ. अश्विनी कल्हापुरे तर उपाध्यक्षपदी सौ. वैशाली शेळके यांची निवड .

*शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी सौ.अश्विनी कल्हापुरे तर उपाध्यक्ष पदी सौ.वैशाली शेळके यांची निवड*

 

             रविवार दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी अहिल्या भवन येथे शिवजयंती उत्सव समिती राहुरी तालुका बैठक संपन्न झाली .या बैठकीत मराठा बहुउद्देशिय संचलित शिवजयंती उत्सव समिती राहुरी तालुका अध्यक्ष पदासाठी एक मताने सौ.अश्विनी कपिल कल्हापुरे तर उपाध्यक्ष पदी सौ.वैशाली महेंद्र शेळके यांचा नावाचा ठराव करण्यात आला.यावेळी शिवजयंती जयंती उत्सव समितीच्या सचिव वर्षा लांबे,खजिनदार विद्या अरगडे,कार्याध्यक्ष ज्योती नालकर,तर सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन समिती पदी संगीत शिक्षिका सौ.ज्योती वर्पे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

            राहुरी येथे सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्तीची समोर महिलांचे टाळ पथकाचे संचलन तसेच लेझीप पथक संचलन केले जाणार आहे.तसेच सनई वादन केले जाणार आहे.या शिवजयंती कार्यक्रमात लहान मुलांचे नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.सर्व कार्यक्रम आनंद ऋषीजी उद्यान गोकुळ कॉलनी येथे होणार आहे.

              या प्रसंगी नूतन अध्यक्ष सौ.अश्विनी कल्हापुरे म्हणाल्या की गेल्या अनेक वर्षांपासून मराठा बहुुउद्देशिय संस्था संचालित शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असणाऱ्या अठरा पगड ,बारा बलुतेदार समाजाला सोबत घेवून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.प्रत्येक वर्षी राहुरी शहरासह तालुक्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद नेहमी मिळत असतो.राहुरी शहरातील शिवजयंती उत्सवाची तयारी साठी सर्व महिला भगिनी सज्ज झालेल्या आहेत.

           

या बैठकीस राजश्री घाडगे,पल्लवी वामन,राजश्री म्हसे,पुनम शेंडे,पौर्णिमा फुलसौंदर,सुजाता लगे,श्रुती वर्पे,जानका लबडे,रोहिणी कोल्हे,कविता नरोडे,कल्याणी गुलदगड, सुरेखा माकोने, राणी घाडगे,अर्चना लबडे,भारती तनपुरे,सीमा लुक्कड, गीता चव्हाण, तृप्ती सिनारे आदी उपस्थित होत्या.