छत्रपती संभाजी राजें राजासारखे मन, मनासारखे राजे.
छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या सोबत आमरण उपोषणासाठी बसलेल्या तीन मराठा शिवभक्तांना स्वतःच्या हाताने ज्यूस पाजले व त्यांचे उपोषण सोडले. ते म्हणाले मी स्वतः आहे तेव्हा तुम्ही त्रास करून घेऊ नका ,याला म्हणतात जाणता राजा.
छत्रपती संभाजीराजे यांचा हा मनाचा मोठेपणा पाहून सर्वजण भारावून गेले. राजे स्वतः जरी उपोषणाला बसले असले तरी बाहेरून जे मराठा शिवभक्त त्यांच्या समर्थनार्थ आलेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेले आहे व सर्वांची काळजी ते घेत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांना मराठा आरक्षणासाठी जे उपोषण चालू आहे त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. विविध ठिकाणी लाक्षनिक उपोषण करून त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बंद पाळले जात आहेत.