गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व न्या. चंद्रचूड यांनी घेतले विधीवत शनि दर्शन.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी शनिशिंगणापूर येथे विधीवत शनि दर्शन घेतले.
यावेळी पोलिस यंत्रणेकडून कडक अशा स्वरूपाचा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बनकर व विश्वस्त मंडळाने त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर नवी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डॉ. डी वाय चंद्रचूड हे सुद्धा शनि दर्शन घेण्यासाठी त्यांच्या सोबत आले होते.
शनिशिंगणापूर येथील सुरू असलेल्या विकासकामांचा या दोघांनी आढावा घेतला.