परभणी येथील न्यायालयीन कोठडीत कार्यकर्त्याचा संशस्पद मृत्यू प्रकणात विद्रोही विद्यार्थीचे निवेदन.

परभणी येथील न्यायालयीन कोठडीत कार्यकर्त्याचा संशस्पद मृत्यू प्रकणात विद्रोही विद्यार्थीचे निवेदन.

श्रीरामपूर: परभणी येथील संविधान प्रतिमेची तोडफोड करून विटंबना केल्या च्या घटनेच्या निषेधार्थ संविधान सन्मानार्थ करण्यात आलेल्या आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करत कोंबिंग ऑपरेशन केले. या दरम्यान गंभीर जखमी झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलिस कष्टडीत मृत्यू झाला आहे. संबधित आरोपीवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाही करण्यात यावी, तसेच मयताच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी करत श्रीरामपूर येथील विद्रोही विद्यार्थी संघटना यांनी तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन पाठवले. प्रसंगी राहुल आहेर, संकेत कोरडे, गौतम राऊत, सुनील वाघमारे, मुस्ताकभाई तांबोळी, संजय वाहुळ, अमोल सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.