चाईल्ड करियर इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

चाईल्ड करियर इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

*चाईल्ड करिअर स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*

 

  नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील पंचक्रोशीत नामांकित असलेली 'चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअरकॉलेज' मध्ये दि.12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती आणि युवा दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.जिजामाता व विवेकानंदांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि शहाजी राजे व जिजामातेच्या वेशभूषेतील प्रमुख पाहुणे श्री. विश्वास मते व सौ.वैशाली मते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्तानी माजी मुख्याध्यापक सतीश मुळे हे होते.,तर प्रमुख पाहुणे पोलीस पाटील ॲड.सौ.अंजली काळे श्री. संतोष काळे , श्री.विश्वास मते व सौ.वैशाली मते ,किशोर मते,नवनाथ मते,अशोकजी कल्परुक्ष हे उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री. शारुख सय्यद यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य संदीप खाटीक यांनी केले.

      जिजामाता व विवेकानंदांचे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.श्री.सतिष मुळे सर यांनी विवेकानंदांचा जीवनपट ,तर श्री. संतोष काळे सर यांनी जिजामातेचा इतीहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. ॲड.सौ.अंजली काळे यांनी जिजामातेचे स्री जीवनातील स्थान स्पष्ट केले.जिजामाता व स्वामी विवेकानंद हे आजच्या मुलांमुलीसाठी आदर्श असले पाहिजे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री.सागर बनसोडे यांनी केले.शेवटी रेणुका गोरे यांनी आभार व्यक्त केले...