मागील दीड वर्षात 89 अल्पवयीन अपहरित मुलींचा शोध

26/09/2025 *मागील दीड वर्षात एकूण 89 अल्पवयीन अपहरित मुलींचा शोध*              

   * गोटुंबे आखाडा राहुरी येथील अल्पवयीन मुलगी ही रागाच्या भरात घर सोडून गेलेली तिचा शोध घेऊन राहुरी पोलिस तपास पथकांनी ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या ताब्यात दिले 

          दि.19/09/2025 रोजी सकाळी 03/00 वाजता फिर्यादी यांची मुलगी ही गोटुंबे आखाडा तालुका राहुरी येथून किराणा दुकानातून चॉकलेट आणते असे सांगून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे तक्रार दाखल केल्याने दाखल गुन्हाचे कुठलेही प्रकारचा मागमूस नसताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर अल्पवयीन मुलगी ही राहुरी येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथक तपास कामी रवाना होऊन आरोपीस राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक 24/09/2025 रोजी राहुरी येथे मिळुन आल्याने तिस ताब्यात घेऊन पुढील कारवाई करून अल्पवयीन मुलीस तिचे वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे  

     सदर कारवाई मा. सोमनाथ घारगे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोसई गणेश वाघमारे, पोहे कॉ/ राहुल यादव, पोहवा दारकुंडे,पोकॉ/ इफ्तेखार सय्यद ,शिरसाठ तसेच मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास पोसई / गणेश वाघमारे सह रायटर पोकॉ / इफ्तेखार हे करीत आहेत.

      सदर गुन्ह्याबाबत तसेच इतर काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क - 8788891147 वर माहिती द्यावी

         ( संजय आर ठेंगे )

         पोलीस निरीक्षक

       पोलीस स्टेशन राहुरी