भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन जिल्हा कार्यकारिणीची भव्य बैठक आणि पदवाटप सोहळा

राहुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन च्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक

दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता उत्साहात पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करत विविध पदांची जबाबदारी देण्यात आली.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पँथर ऋषी पोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी ठोस दिशानिर्देश देण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष दिपक साळवे यांनी केले होते. तर या बैठकीचे अध्यक्षस्थान संजय जाधव यांनी ग्रहण केले.

बैठकीदरम्यान अमोल लोखंडे, महेंद्र मुसमाडे, देविदास गायकवाड.सोनू खरात, दिपक चक्रे, शाम आढाव, नाना शिंदे. प्रसाद पंडित. अनिकेत साळवे.यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

जिल्हा कार्यकारिणी पदवाटप 

जिल्हा महासचिव म्हणून योगेश चंद्रभान पवार.जिल्हा उपाध्यक्ष राहुल कचरू गायकवाड.जिल्हा उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र शिंदे.सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष आनंद संजय पवार. शहर प्रमुख आशिष सोमनाथ गायकवाड. कॉलेज महासचिव रोहित प्रशांत कसबे. कॉलेज सचिव अविष्कार शाम आढाव यांना पद नियुक्ती देण्यात आल्या 

कार्यक्रमात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. संघटनेच्या वाढीसाठी, विद्यार्थी हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी सक्षमपणे काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.बैठकीचा समारोप करताना उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि संघटनेने अधिक बळकटपणे कार्यरत राहावे, असा विश्वास व्यक्त केला.

 राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे