घटनेची माहिती कळताच खेडले परमानंद परिसरात एकच खळबळ उडाली होती.
व्याघ्र सदृश्य दोन मृतदेह ,कारभारी शिंदे व भानुदास शिंदे यांच्या विहिरीत आढळल्याने खेडले परमानंद शिवारात एकच खळबळ उडाली ,वन विभागाचे निरीक्षक ढेरे साहेब व त्यांची टीम घटनास्थळी पाचारण केल्यानंतर अवघ्या
एक तासात हजर झाली.
परंतु ते रान बौक्के असल्याचे निष्पन्न झाले व ती मृत अवस्थेत व पाण्यात असल्याकारणाने ते फुगून मोठे दिसू लागल्यामुळे ते वाघ जातीचे असल्याचा संशय नागरिकांना येत होता.
परंतु वननिरीक्षक ढेरे यांनी व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या असे निदर्शनात आले की ही रान बोके असून पाण्यात पडल्यामुळे ते फुगुन त्यांचा आकार मोठा झाला त्यामुळे ते नागरिकांना वाघाची पिल्ले असल्यासारखे वाटले.
असे अंतिम निरीक्षणात निष्पन्न झाले असल्याचे जाहीर केले.
यावेळी घटनास्थळी तंटामुक्ती अध्यक्ष दगुबाबा हवालदार, भास्कर गीते, विजय शिंदे, बबन गीते , संजय शिंदे, भाऊसाहेब शिंदे,प्रकाश वैरागर ,आदी नागरिक उपस्थित होते.