गावठी कट्टा ताब्यात बाळगणारा गुन्हेगार राहुरी पोलीसांकडून अटक.
प्रस्तुत घटना अशी की, दिनाक 24/03/2023 रोजी पोनि.श्री संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वळण गावात हनुमान मंदिर परिसरात एक इसम स्वतः चे कब्जात गावठी कट्टा जवळ बाळगुन उभा आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि. श्री संजय ठेंग. यांनी तात्काळ तपास पथकास सदर ठिकाणी जावुन बातमीतील हकीगत समजावून सांगून खात्री करुन कारवाई करा. असा आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ माहिती ठिकाणी पोहचले असता माहितीप्रमाणे इसम नामेदादासाहेब उर्फ कृष्णा शंकर कुलट वय 25 वर्ष राहणार वळण तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर मिळून आला व त्याचे कंबरेला गावठी कट्टा मिळुन आला. सदर आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं. 325/2024 शस्त्र अधिनियम कलम 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमुद गुन्हयात त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सुदर्शन बोडके करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो.पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे, गोवर्धन कदम, सतीश कुराडे, सचिन ताजने,आजीनाथपाखरे, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर तसेच पोलीस नाईक संतोष दरेकर, सचिन धनाड नेमणूक मोबाईल सेल श्रीरामपूर यांनी केलेली आहे.