चांद्यातील विद्यार्थिनींना रोडरोमिओंचा त्रास, शिक्षकांसह पालकही वैतागले, तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी .
चांद्यातील विद्यार्थीनींना रोड रोमियोंचा त्रास, शिक्षकांसह पालकही वैतागले, तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी.
नेवासा तालुक्यातील चांदा येथे जिल्हा मराठा विद्याप्रसाद मंडळाचे जवाहर माध्यमिक विद्यालय असून हे विद्यालय सुटल्यावर रोड रोमिओ आपल्या दुचाकी वर बसून कर्णकर्कश आवाजाने हॉर्न वाजवणे, दुचाकी सुसाट वेगाने चालविणे, मुलींची छेड काढणे असे प्रकार सातत्याने घडत असून याला शिक्षकासह पालकही वैतागले आहेत . शाळा सुटण्यावेळी पोलिसांनी विद्यालय परिसरात राऊंड मारावा व गावात फिरणाऱ्या रोडरोमओंचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालक वर्गामधून केली जात आहे . या आधी सुद्धा पोलिसांना याबाबत तक्रारी दिलेल्या आहेत . आता या टारगटांचा त्रास वाढला असल्यामुळे याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे . शाळेच्या गेटपाशी हे रोड रोमियो घुटमळत असतात व विद्यालयात क्लास चालू असताना जोरजोरात हॉन वाजवत घिरट्या मारत असतात . तातडीने या रोड रो निमोयोंचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे .
पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे . शाळेच्या परिसरामध्ये असलेल्या दुकानांमध्ये व रोडने असलेल्या दुकानांमध्ये हे रोड रोमिओ तळ ठोकून बसलेले असतात . मोठमोठ्याने आवाज करतात त्यामुळे या परिसरात छोटे-मोठे अपघातही घडले आहे अशा टार्गट रोमओंचा तात्काळ बंदोबस्त करावा .मुली ज्या गल्लीतून शाळेला जातात त्याच गल्लीमध्ये अवैद्य धंद्याचा बाजार असल्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होत आहे .त्यामुळे चालणारे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे .








