*प्रसादनगर झोपडपट्टी जागा धारकांचे नावावर करणेसाठी डॉ. तनपुरे कारखान्याला प्रहार चे साकडे..!*
राहुरी फॅक्टरी - १६ एप्रिल
देवळाली प्रवरा हद्दीतील राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगर भागात निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करणेस नाहरकत प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याला निवेदन देऊन विनंती करणेत आली आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. सरोदे साहेब यांना दिलेल्या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, देवळाली प्रवरा महिला शहर अधक्ष्या भाग्यश्री कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहर अधक्ष्या राजनीताई कांबळे, राहुरी फॅक्टरी शहर उपअध्यक्ष एकनाथ वाणी, राहुरी फॅक्टरी महिला शहर उपअध्यक्ष वंदना कांबळे, राहुरी फॅक्टरी महिला शहर उपअध्यक्ष अफसाना सय्यद, राहुरी फॅक्टरी शहर महिला सचिव लैला शेख, देवळाली प्रवरा महिला शहर उपअधक्ष्या सुरेखा शिंदे, देवळाली प्रवरा महिला शहर उपअधक्ष्या आशा माळी आदींनी स्वाक्षरी केली आहे. स्वाक्षरी धारकांसह अब्दुल समद शेख उर्फ लाला भाई, सखाहरी पुंड दाजी, मारुती खंडागळे, प्रभाकर कांबळे आदी निवेदन देताना उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे की, प्रसादनगर भागातील ग. न. ५४२ मध्ये जवळपास ४० वर्षांपासून मागासवर्गीय बहुल झोपडपट्टी धारकांचे वास्तव्य आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेने यथोचित ठराव संमत करून प्रसादनगर चा गट नंबर ५४२ हा भाग स्लम ( झोपडपट्टी ) घोषित करणेचा मा. जिल्ह्याधिकारी साहेब अहमदनगर यांना प्रस्ताव दिलेला आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय मधील नियम ४ मध्ये निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण धारक मागासवर्गीय असेल तर त्यांना ती जमीन विनामूल्य प्रदान करणेची तरतूद आहे.
त्यानुसार मा. जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांनी महसूल विभागा मार्फत देवळाली प्रवरा येथील ग. न. ५४२ मधील प्रसादनगर झोपडपट्टी नियमाकुल करणेबाबत राहुरीचे तहसील कार्यालयाला नियमोचित सूचना दिलेल्या आहेत. तथापि मध्यंतरी चे कालावधीत उपरोक्त प्रसादनगर येथील ग. न. ५४२ उताऱ्यावरील महाराष्ट्र शासन हे नाव कमी होऊन डॉ बा बा तनपुरे सह साखर कारखाना हे नाव लागले असलेने प्रसादनगर झोपडपट्टी नियमाकुल होणेकामी आपले कारखान्याचे नाहरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. तरी सदरचे नाहरकत प्रमाणपत्र मिळावे अशी निवेदनाची शेवटी विनंती करणेत आली आहे.