अहमदनगर म.फु कृ.विद्यापीठ येथील कुलगुरूंच्या आदेशाने स्थानिक शेतकर्‍याच्या रस्त्याची केली कोंडी ....

अहमदनगर म.फु कृ.विद्यापीठ येथील कुलगुरूंच्या आदेशाने स्थानिक शेतकर्‍याच्या रस्त्याची केली कोंडी ....

अहमदनगर म.फु.कृ.विद्यापीठातील कुलगुरू प्रशांत पाटील यांच्या आदेशाने खडांबे बु., वरवंडी गाव शिव रस्ता, नगर - मनमाड रस्त्याला दुभाजून गाव नकाशा ग्रा मा क्रमांक १६२ रस्ता विद्यापीठाच्या जेसीबीच्या सहाय्याने केला बंद, या पूर्वी देखील विभाग प्रमुख व कुलगुरू साहेब 3 जुलै रोजी ड विभागात झाडे लावण्यासाठी आले व गाव नाकाशातील रस्ता बंद करून गेले होते, त्या नंतर ग्रामस्थांनी मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांना २७ जुलै २०२२, निवेदन दिले, तसेच निवेदन प्रत मा तहसीलदार राहुरी, कुलसचिव मफुकृ विद्यापीठ, तसेच मा आमदार प्राजक्त तनपुरे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भाऊ मोरे,शिवसेना नगर जिल्हाअध्यक्ष पै श्री रावसाहेब खेवरे यांना स्थानिक नागरिक यांनी निवेदन दिले होते, मा महानंद माने यांच्याशी मा आ प्राजक्त तनपुरे यांनी चर्चा करून रस्ता सुरू केला होता, त्या नंतर पुन्हा आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी पुन्हा जेसिबी च्या साहाय्याने रस्ता चर खोदून बंद केला या बाबत कुलगुरू पाटील यांचे आदेश आहेत असे विद्यापीठाचे अधिकारी सांगत आहे, नागरीकांचे रस्त्याविणा हाल सुरू झाले आहे, शाळा,दुध, कामगार, यांना तालुक्याला जाणे तसेच उसाच्या गाड्या काढणे झाले कठीण गाव नकाशावरील रस्ता मनमानी कारभाराने बंद केला आहे, नेवेदनात संदर्भ क्रमांक १ व २ नुसार शासन निर्णय काढून सरकार रस्ते खुले करण्याचे आदेश देते व विद्यापीठाचे अधिकारी त्या शासन निर्णय पायमल्ली करीत रस्ते बंद करीत आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सुविधा देणे लांबच पण हे विद्यापीठ शेतकऱ्यांचे हाल करीत आहे,यावर मा तहसिलदार साहेब व जिल्हाअधिकारी मा श्री राजेंद्र भोसले साहेब काय निर्णय घेणार याकडे सर्व शेतकरी व सहा गावचे ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त या सर्वाचे लक्ष लागुन आहेत.

वरवंडी येथे जाणारा शिव रस्ता ही अशाच प्रकारे वळू प्रकल्पाच्या कंपाऊंन्ड शेजारून काढण्यात आला आहे त्या रस्त्याची ही अध्याप दुरुस्ती अथवा काम झाले नाही नगर -मनमाड रस्ता ही खड्यांमध्ये व्यस्त झाला आहे तसाच ग्रामीन रस्त्यांची सुद्धा अशाच प्रकारे हाल करून बंद करायचे आहे काय अशी चर्चा सध्या स्थानिकांमध्ये सुरू आहे. जर रस्ता दोन दिवसांत पूर्वरत केला नाही तर ग्रामस्थ उपोषण करतील असे प्रदीप लांडगे यांनी सांगितले..!