हायवे पासून २५० ते ३०० फुट अंतरावरील टेकडीवर एका २२ वर्षिय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केली.
तालुका राहुरी व म.फु.कृ.विद्यापिठाच्या मध्यभागी असलेल्या नगर - मनमाड हायवे रोड पासून २५० ते ३०० फुट आत टेकडीवरील एका झाडाला तुषार लक्ष्मण घुंमरे अंदाजे वय वर्षे २२ या तरुणाने एका नविन सुती दोरीच्या सहाय्याने गळ फास घेऊन आत्महत्या केली आहे.
त्याचे आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.
त्याने त्याच्या एका नातेवाईकाला फोनवरून त्याचे लोकेशन टाकले होते असे समजले त्यामुळे त्याला शोधायला ज्यास्त वेळ लागला नाही दि.१४.०५.२०२२ रोजी रात्री ९.३० ते १०.३०. वा. सुमारास त्याने टेकडीवर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटणेची माहीती समजताच ता.राहुरी येथील पो.उप निरीक्षक श्री निरज बोकील. पो.हे.काँ. एकनाथ आव्हाड.पो. काँ.थोरात व पो.काँ.लक्ष्मण खेडेकर.हे घटणास्थळी दाखल झाले परंतू तोपर्यंत तुषार याने आपली जिवनयात्रा संपवली होती.तो या टेकडीच्या बाजुला असलेल्या नगर-मनमाड हायवे च्या बाजुला आपली चार चाकी गाडी क्र.MH14 EY 0053 च्या सहाय्याने इथपर्यंत आला होता त्याच्या नातेवाईकाला विचारले असता गाव खर्डा ता.जामखेड जिल्हा अहमदनगर येथे त्याचे किराणा मालाचे दुकान होते.