अशोक माध्यमिक विद्यालय अशोकनगर. . गुरूजन कृतज्ञता सोहळा संपन्न. .. !!
श्रीरामपूर :::---
श्रीरामपूर तालुक्यात असणारे अशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे अशोक माध्यमिक विद्यालय अशोकनगर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर सन 1992 ते सन 1998 दरम्यान असलेल्या गुरुजनांचा कृतज्ञता व सत्कार सोहळ्याचे आयोजन श्रीरामपूर येथील नावाजलेले व प्रसिद्ध असलेले डॉक्टर विनायक मोरगे यांनी केले होते.
सन 1992 ते सन 1998 च्या दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व रयत शिक्षण संस्थेचे अशोक माध्यमिक विद्यालयांमध्ये डॉक्टर विनायक मोरगे यांनी शिक्षण घेतले होते. त्यानंतर डॉक्टरांनी एम.डी.मेडिसीन या वैद्यकीय उच्चपदवीचे शिक्षण घेतले व आपले स्वतःचे मोरगे हॉस्पिटल श्रीरामपूर येथे स्थापित केले आहे.परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन आपण या वरच्या स्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत अशी मनात आदराची भावना ठेवून ज्या गुरुजनांनी माझा शिक्षणाचा पाया घालून मला उच्चपदावर नेले त्यांचा मी ऋणी राहून गुरुदक्षिणा म्हणून डॉक्टर विनायक मोरगे यांनी सन 1992 ते सन 1998 पर्यंत च्या सर्व गुरुजनांना स्वयंवर मंगल कार्यालय या ठिकाणी एकत्र करण्याची भावना त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून आलेले त्यांचे वर्ग शिक्षक श्री. एस.जी.नाईकसर यांच्या जवळ व्यक्त केली. या कामी डॉक्टर मोरगे यांचे बंधू ज्ञानेश्वर मोरगे यांनी त्यांना खूप मदत केली.अखेर रविवार दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सर्व गुरुजनांना एकत्र बोलावले गेले. आलेल्या सर्व गुरुजनांचे जनसेवेचे व्रत घेतलेल्या डॉक्टर विनायक मोरगे व त्यांची पत्नी डॉक्टर सौ.सरोज मोरगे या दाम्पत्याने दर्शन घेऊन स्वागत केले. प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी इयत्तेत शिकविणाऱ्या शिक्षिका श्रीमती. सुनंदा शिंदे मॅडम या अनेक वर्षांने भेटल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले डॉक्टरांचे मन गहिवरुन आले.
कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने तसेच डॉक्टर विनायक मोरगे यांच्या मातोश्री प्रमिला मोरगे यांचे पाद्यपूजन डॉक्टर विनायक मोरगे व डॉक्टर सौ. सरोज मोरगे यांच्या हस्ते करून करण्यात आली. प्रथमत: सुरुवातीस कै.जरे सर कै.कुंभारसर कै.कोळपकरसर कै.रूपवतेसर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विनायक मोरगे यांनी केले.प्रास्ताविक भाषणात त्यांनी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व कार्यकाळ शिक्षक व शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासक्रम अभ्यास व अभ्यास न केल्यानंतर दिलेल्या शिक्षेचा हि घटनाक्रम डॉक्टरांनी सांगितला.यांत विशेष करून त्यांनी पहिली ते चौथी पर्यंत त्यांना शिकविणाऱ्या सुनंदा शिंदे मॅडम यांच्या विषयी खूप अनुभव सांगितले.पंचायतसमिती श्रीरामपूर याठिकाणी शिंदे मॅडम सह माझा सुध्दा सत्कार गट शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते झाला याचा ही उल्लेख डॉक्टर विनायक मोरगे यांनी प्रामुख्याने केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाची सूचना श्री.सोपानराव नाईक यांनी मांडली तर त्यांस अनुमोदन श्री. शिवाजी गोरे सर यांनी दिले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अशोक माध्यमिक विद्यालय अशोकनगर तथा भास्करराव गलांडे पाटील विद्यालय अशोकनगर चे मुख्याध्यापक श्री.निवृत्ती पठारे सर तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक तसेच माजी मराठी विभाग प्रमुख आर.बी.एन.बी कॉलेज चे प्राध्यापक डॉक्टर बाबुराव उपाध्ये सर हे होते तर प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे श्री.चांगदेव कडू सर ,श्री जी.एस.उंडे सर ,श्रीमती सुनंदा शिंदे मॅडम व डॉक्टराच्या मातोश्री प्रमिला मोरगे हे होते .आपल्या प्रमुख पाहुणे तसेच मार्गदर्शक भाषणात डॉक्टर बाबुराव उपाध्ये यांनी शिक्षकाला काय हवं. .. ?? विद्यार्थ्यांनी मोठे व्हावं. . संस्कारांच गाणं गांव विद्याथ्यांनी मोठं व्हावं. . !! हि समर्पक कविता वाचून दाखवली.अध्यक्षीय भाषणात श्री. निवृत्ती पठारे सर यांनी गुरू-शिष्याचं नातं कस जपल जातं या विषयी मार्गदर्शन केले.आलेल्या सर्व गुरुजनांचा आदरातिथ्य सन्मान डॉक्टर विनायक मोरगे व डॉक्टर सौ. सरोज मोरगे यांच्या हस्ते सन्मानपत्र , शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.यावेळी श्री.नाईक सर ,श्री सारंगधर सर, गहिरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले..!!
शेवटी कार्यक्रमाचा समारोप आलेल्या सर्व गुरुजनांचे डॉक्टर विनायक मोरगे यांनी आभार मानून केला तसेच सर्व आलेल्या गुरुजनांना त्यांनी चालू केलेला प्रशस्त असा दवाखाना बघण्या करता यावे अशी विनंती सर्व गुरुजनांना केली.या कार्यक्रमासाठी एकूण 50 ते 55 गुरुजन वर्ग हजर होते.आलेल्या सर्व पाहुण्यांना व गुरुजनांना उत्तम आशा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या शेवटी श्री. व सौ. डॉक्टर मोरगे यांचा सत्कार श्रीमती सुनंदा प्रेमानंद शिंदे मॅडम,श्यामल साळवे मॅडम,अभिषेक शिंदे, बी.पी.एस.न्यूज चे प्रतिनिधी प्रशांतराजे शिंदे ,श्री शिवाजी गोरे सर श्री.कोरडे सर श्री.संजय गायधने सर यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रसन्नकुमार धुमाळ यांनी उत्तम पद्धतीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर यांचे बंधू ज्ञानेश्वर व सर्व मोरगे परिवार तसेच सर्व हॉस्पिटल स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता सर्व गुरुजनाना वृक्षाचे रोपटे देऊन वाटप करण्यात आली. !!