जिल्हा परिषद गोयकर वस्ती शाळाची विद्यार्थिनी श्रद्धा गोयकर वकृत्व स्पर्धेत केंद्रात प्रथम
*जिल्हा परिषद गोयकर वस्ती शाळेची विद्यार्थिनी श्रद्धा केंद्रात वकृत्व स्पर्धेत प्रथम.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण):- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळे अंतर्गत विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात येतात. केंद्राच्या विविध कला स्पर्धा सोमवार दिनांक ९ रोजी पार पडल्या. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोयकर वस्ती शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा बाळासाहेब गोयकर हीने बालगटात माझा आवडता सण या विषयावर भाषण करून देडगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तिची आता नेवासा तालुकेस्तरीय स्पर्धे करता निवड झाली आहे. तिला नेवासा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड साहेब ,विस्तार अधिकारी श्रीमती शेख मॅडम ,केंद्रप्रमुख श्रीमती लाटे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक चांडे सर व सहशिक्षक श्री कोकाटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तिचे आई-वडील छत्रपती संभाजी नगर या शहरात काम धंदा करतात व ती मुलगी आपल्या आजी जवळ राहून तिने हे घवघवीत यश मिळवले. तिच्या यशाबद्दल गावचे सरपंच
चंद्रकांत मुंगसे, उपसंरपच महादेव पुंड, दत्ता पाटील मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ गोयकर, युवा नेते निलेश कोकरे , सोसायटी चेअरमन सागर बनसोडे, व्हाईस चेअरमन जनार्दन देशमुख, बाबासाहेब मुंगसे,नकुश गोयकर , महादेव मुंगसे ,अरुण मुंगसे , नवनाथ रक्ताटे ,शालेय व्यवस्थापन चे अध्यक्ष अशोकराव कमलाकर गोयकर, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर ,गोयकरवस्ती व परिसरातील ग्रामस्थानी तिचे विशेष अभिनंदन करत कौतुक होत आहे.