खेडले परमानंद येथील सराफास लुटणारा जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
प्रतिनिधी:- खेडले परमानंद नेवासा
खेडले परमानंद येथील सराफ निखिल बाळासाहेब आंबीलवादे आपले दैनिक कामकाज आटोपून दुकानातील दागिने बॅगमध्ये घेऊन घराकडे येत असताना भर दिवसा.
अज्ञात व्यक्तींने त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. परंतु त्यांनी त्यांच्या डोळ्यावर अचानक मिरचीपूड फेकली. व त्यांच्या पाठीवर असलेली दागिन्यांची बॅग घेऊन च फरार झाले.
सदर घटनेची फिर्याद फिर्यादी निखिल बाळासाहेब आंबीलवादे यांनी सोनई पोलीस स्टेशन यांच्याकडे दिली होती.
त्यानुसार सोनई पोलीस स्टेशन यांनी 394/34 प्रमाणे 21 /01/2020 रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी हा फरार होता.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेश दिले . सदर गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्या बाबत पोलीस निरीक्षक अनील कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले.
या आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनील कटके स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलिस अंमलदार यांना फरार पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने ,सहायक फौजदार राजेंद्र वाघ ,संजय खंडागळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू फुलाने ,देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोलीस नाईक भिमराज कसे, रवी सोनटक्के ,पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन बेरड या सर्वांनी मिळून श्रीरामपूर परिसरातील पेट्रोलिंग करून आरोपींचा शोध घेतला असता पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमी द्वारे तो सध्या सुर्यानगर तालुका श्रीरामपूर येथे राहत असल्याचे कळाले अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने
क्षणाचाही विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले.
आरोपीच्या घराचा ठावठिकाणा शिताफीने घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपीचे नाव विजय रामकृष्ण देडगावकर असून राहणार सुर्या नगर वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर असा त्याचा पत्ता आहे.
वरील गुन्हा बाबत सदर आरोपींने कबुली दिलेली आहे .
गुन्ह्याची पुढील कारवाई सोनई पोलीस स्टेशन करीत आहे
सदर गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
स्वारगेट पोस्ट पुणे, चतुर्श्रुंगी पोस्ट पुणे, खडकी पोस्ट पुणे, कोथरूड पोस्ट पुणे, चिंचवड पोस्ट पुणे, तोफखाना पोस्ट पुणे अशा विविध पोलीस स्टेशन मध्ये या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर , श्रीरामपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व आमदार यांनी केलेली आहे.