दत्तनगर व आगाशेनगर मधील वीज प्रश्नाबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन.

दत्तनगर व आगाशेनगर मधील वीज प्रश्नाबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन.
दत्तनगर व आगाशेनगर मधील वीज प्रश्नाबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ):- दि. ०५/०५/२०२५  दत्तनगर  ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. आंबेडकर वसाहत, आगाशनगर, रेणुकानगर, ज्ञानदीप विद्यालय परिसर तसेच इतर ठिकाणी गेली अनेक दिवसापासून ऐन उन्हाळ्यात विजेचा प्रश्न निर्माण झाला असून या भागातील नागरिकांनी वीज प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी दत्तनगर ग्रामपंचायत पदाधिकारी व आगाशेनगर मधील प्रतिष्ठित नागरिकांनी महावितरणाचे श्रीरामपूर विभागाचे उपअभियंता प्रमोद केदारी यांची भेट घेऊन निवेदन दिले संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार जास्त क्षमता असलेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवण्याचे आदेश दिले तसेच या प्रश्नासंदर्भात आमदार हेमंत ओगले यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागणी व शिफारस पत्र दिले आहे. 

            याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष प्रेमचंद कुंकूलोळ, माजी सरपंच पी एस निकम, माजी सरपंच सुनील शिरसाट, उपसरपंच सुरेश जगताप, डॉक्टर वसंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, विशाल पठारे, भगवान सरोदे, प्रकाश निकाळे, श्रीरंग गंगावणे, जाधव साहेब यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.