अवैध वृक्षतोड करून पत्रकारांना दमबाजी करत गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या इसमावर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल .
मुळा पाटबंधारे विभागाच्या कॉलनीमध्ये अवैधरित्या वृक्षतोड.
मुळा पाटबंधारे विभागाच्या सोनई येथील कॉलनीमध्ये कॉलनी शेजारील शेतकऱ्याकडून अवैधरित्या वृक्षतोड करण्यात येत आहे.सदर घटनेबाबत सविस्तर वृत्तांत असा आहे की दिनांक 06 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी साडेअकराच्या दरम्यान आमच्या वृक्षप्रेमी पत्रकार बांधवांना अवैध वृक्षतोडी संबंधित माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कॉलनीमध्ये अंदाधुंद दिवसाढवळ्या मशीनद्वारे वृक्षतोड चालू असल्याचे चित्रीकरण पत्रकारांनी केले . संबंधित शेतकऱ्यांनी पत्रकारांना तुम्ही केलेले व्हिडिओ चित्रीकरण डिलीट करा अन्यथा तुमच्यावर पैसे मागितल्याचा गुन्हा दाखल करील अशी पत्रकारांना धमकी दिली व दमबाजी केली.
घटनास्थळावरूनच पत्रकारांनी वन विभाग व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला .परंतु त्यांच्याकडून त्या दिवशी कुठलीही कारवाई न झाल्यामुळे संबंधित पत्रकार बांधवांना वनविभाग अहमदनगर यांच्याकडे धाव घ्यावी लागली.
दिनांक 07 सप्टेंबर 2022 रोजी वन विभाग,जिल्हाधिकारी साहेब,पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेल्या अर्जानंतर 8 ऑगस्ट रोजी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
संबंधित व्यक्तीवर पत्रकारांना दमबाजी करून दबाव तंत्राचा वापर केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तसेच अवैधरित्या वृक्षतोड केलेल्या झाडाची पाहणी करण्यासाठी नेवाशाचे वनरक्षक अधिकारी यांनी पंचनामा करून वरिष्ठांच्या आदेशाने लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे .