अहिल्याबाई होळकर शाळेच्या वतीने गावात मुलांची फेरी काढून हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यासाठी जनजागृती.

अहिल्याबाई होळकर शाळेच्या वतीने गावात मुलांची फेरी काढून हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यासाठी जनजागृती.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय च्या वतीने गावात मुलांची फेरी काढून हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत सर्वांनी आपल्या घरावर झेंडा उभारण्यासाठी हर घर तिरंगा, भारत माता की जय, झाडे लावा झाडे जगवा,या मुलांनी गावात घोषणा देत फेरी पूर्ण केली.

    या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद यांनी जनजागृती साठी मोठी उपस्थिती दाखवली. तर देडगाव चे भूमिपुत्र भारत मातेचे वीर जवान दत्तात्रय चेडे मेजर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. व त्यांनी शाळेसाठी अामृत महोत्सव साठी रक्कम देऊ केली.

       फेरी पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी बोलतांना म्हटले की,देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. म्हणुन आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने जनतेच्या मनात स्वतंत्र लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या विर जवानाच्या व क्रतीकारक स्वतंत्र सैनिकांच्या प्रती जनतेच्या मनात स्वतंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीच्या जाज्वल भावना कायम मनात राहाव्यात त्यानिमित्ताने हर घर तिरंगा हा कार्यक्रम यशस्वीरित्या सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी राबवावा हे मार्गदर्शन करत तिरंग्याचे नियम समजावून सांगितले.

    या कार्यक्रमाचे देडगाव ग्रामस्थ च्या वतीने कौतुक व अभिनंदन होत आहे. व देड

गावकरांनी हर घर तिरंगा लावू हा निश्चय मनात घेतला आहे.